पहीला वेळ

3,703
Anonymous asked 2 years ago

aaushyatil pahila vahila sex kratanna konti kalji ghyavi

v mi eklel ahe ki first time physical hotanna kahitri kontatri najhuk laingik part tutato.
v tyatun rakt yete.

kay he barobr ahe???

deepak pawar replied 2 years ago

काय करावे

I सोच replied 1 year ago

कृपया तुम्हाला काय प्रश्न किंवा शंका आहे ते विस्ताराने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणे सोपे जाईल..

1 Answers
I सोच answered 2 years ago

आयुष्यातील पहिला वहिला सेक्स करताना सर्वप्रथम दोन्ही जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे.
सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. आणि पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धर नका. तुम्हाला आनंद मिळणं आणि छान वाटणं जास्त महत्त्वाचं आहे.
मुलींच्या योनीमार्गात एक लवचिक पडदा असतो, ज्याला हायमेन असं म्हणतात. पहिल्या सेक्सच्या वेळी हा पडदा विलग होतो आणि कधी कधी त्यातून रक्त येतं. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात घ्या. हा पडदा  सायकल चालवणं, खेळ, पोहणं, कष्टाची कामं अशा इतरही कारणांनीही फाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या योनीमार्गात हा पडदा असतोच असं नाही आणि तो पहिल्या सेक्सच्या वेळी फाटून रक्त येतंच असं नाही.
पहिल्यांदाच सेक्स करत असाल तर प्रभावी गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. निरोध किंवा कंडोमचा वापर करा आणि गर्भधारणा किंवा लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांची भीती मनातून काढून टाका.

Gaurav Chitnis replied 1 year ago

सेक्स करताना रक्त आले तर सेक्स करणे थांबवावे का.? सेक्स करताना रक्त आले तर काळजी करण्यासारखे आहे का.? रक्त आले सेक्स करताना कोणती काळजी घ्यावी.???

I सोच replied 7 months ago

कदाचित पहिल्यांदा सेक्स करताना स्त्रियांच्या योनीपटलावराचा पडदा फाटू शकतो आणि त्यातून रक्त देखील येवू शकतं. परंतू हे सगळ्याच मुलींबाबत घडेल असं अजिबात नाही. जर संभोग करताना नेहमी रक्त येत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या. संभोग करताना असं नेहमी रक्त येत नाही. किंवा पुरुषांमध्ये लिंगावरची त्वचा सहज मागे न जाता संभोग करताना जास्त ताणली गेली तर फाटू शकते. यातून रक्त देखील येवू शकतं.अशावेळी डॉक्टरांना दाखवणं जास्त फायदेशीर राहतं. याव्यतिरिक्त विशेष काही कारण नसतं लिंगातून रक्त येण्यासाठी. जर तुमच्याबाबतील याव्यतिरिक्त किंवा असं काहीसं झालं असेल तर डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
रक्त आल्यावरच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला सेक्स करताना त्रास होत असेल, वेदना होत असेल तर ताबडतोब सेक्स थांबवावा. सेक्स मध्ये तुमची आणि जोडीदाराची इच्छा, संमती आणि आनंद महत्वाचा !

You might also like More from author