संबंध केल्यानंतर योनीतून पाणी येते व लाल होते ?

583
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंबंध केल्यानंतर योनीतून पाणी येते व लाल होते ?
1 Answers
let's talk sexuality answered 1 year ago

लैंगिक संबंधांदरम्यान नेहमीपेक्षा थोडे जास्त पाणी/ पंधरा स्राव येणे नैसर्गिक आहे शिवाय लैंगिक संबंधादरम्यान योनीचा रंग बदलू शकतो. त्याचा जर काही त्रास होत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही.

मात्र त्यासोबत नेहमीपेक्षा वेगळा पांढरा स्राव येत असेल, आग, जळजळ होत असेल, वेदना होत असतील तर मात्र ताबडतोब स्त्रीरोग तज्ञांशी संपर्क साधा. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

अंगावरून (योनीमार्गातून) जाणारे पाणी/ स्राव तसेच लिंगसांसर्गिक आजार याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

http://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/

http://letstalksexuality.com/white-discharge/