बायकोची योनी व स्तन चोखावे का तिला खुप उत्तेजना मिळते

10,569
प्रश्नोत्तरेबायकोची योनी व स्तन चोखावे का तिला खुप उत्तेजना मिळते
1 Answers
lets talk sexuality answered 1 year ago

जोडीदाराच्या संमतीने मुखमैथुन केले तर काहीच होत नाही. जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. तसेच हे योनीतून येणारा स्राव तोंडावाटे शरीरात गेला तरीही तो शरीरासाठी हानिकारक नसतो. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. स्तन चोखणे, लैंगिक अवयवांना कुरवाळणे यातून उत्तेजना मिळते यातही चुकीचे काही नाही. त्यामुळे तुम्हा दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळत असेल तर काही हरकत नाही.