बायकोला किती ही कंड आला तरी ती झवऩ्यासाठी पुढाकार घेत नाही खुप लाजते

273
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबायकोला किती ही कंड आला तरी ती झवऩ्यासाठी पुढाकार घेत नाही खुप लाजते
yashtale@gmil.com asked 2 weeks ago

1 Answers
I सोच answered 1 month ago

बायकोला किती ही इच्छा असली तरी ती शरीर संबंधांसाठी पुढाकार घेत नाही. खुप लाजते.

वरील प्रमाणे प्रश्न विचारता आला नसता का? आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून काही जाणून, समजून घ्यायचे असेल तर विचारण्याची, संवादाची काही एक पद्धत असते. तोंडाला येईल ते आपण सहसा रस्त्यावर, जिथे संवाद अपेक्षितच नसतो तिथेच बोलतो. नाही का? आणि हे समजण्यासाठी काही मोठ्या शिक्षणाची किंवा हुद्द्यावर असण्याची गरज नाही.

आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर – आपल्या समाजामध्ये सेक्सविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. विशेषतः मुलींवर आपल्या समाजामध्ये अधिक बंधनं असल्याने त्यांना याविषयी मोकळेपणा यायला वेळ लागू शकतो. यावर एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे, तिच्या कलाने घेणे हाच उपाय आहे. तुमच्यामधील संवाद वाढला की आपोआपच मोकळीक वाढेल आणि लाज हळूहळू कमी होईल. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. तुम्हाला आनंद मिळणं आणि छान वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. पहिल्यांदाच सेक्स करत असाल तर प्रभावी गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. निरोध किंवा कंडोमचा वापर करा.

You might also like More from author