बायको खुपच लाजाळु आहे. लग्नला एक वषे झाले. सेक्सविषयी बोलत नाही.

1,272
प्रश्नोत्तरेबायको खुपच लाजाळु आहे. लग्नला एक वषे झाले. सेक्सविषयी बोलत नाही.
1 Answers
let's talk sexuality answered 1 year ago

आपल्याकडे लैंगिक अवयव आणि लैंगिक संबंधांविषयी मोकळेपणाने सहसा बोलले जात नाही. स्त्रियांना तर लैंगिक गोष्टींविषयी बोलण्याच्या खूपच कमी जागा आणि संधी उपलब्ध असतात. तसेच असं मोकळेपणाने बोलणाऱ्या स्त्रियांना आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. शिवाय मुलींना अगदी लहानपणापासूनच शरीर झाकून ठेवण्यासाठीच शिकविले जाते. ओढणी घे, असले कपडे कशाला घातलेस?, एवढा मोठा गळा कशाला शिवालास अशाप्रकारच्या गोष्टी लहानपणापासून बिंबवल्या जातात. यांसारख्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये लाज किंवा संकोच असू शकतो.

दोन्ही जोडीदारांना एकमेकांच्या शरीराविषयी, लैंगिक अवयवांविषयी माहिती असायला हवं पण संकोचामुळे तसा मोकळेपणा येण्यास वेळ लागू शकतो. तुमच्या जोडीदारामध्ये असा मोकळेपणा यावा यासाठी तुमची भूमिका महत्वाची आहे. जोडीदाराशी संवाद साधा, विश्वास आणि कम्फर्ट निर्माण करा. हळूहळू लाजाळूपण, संकोच कमी होईल.