मला 13 वर्षाचा असताना पासून हस्तमैथुन करायची सवय आहे जी मी 26 वर्षापर्यंत रेग्युलर केली, त्यानंतर पहिला सेक्स करताना लिंग ताठर झाले नाही,पण इतर वेळी मात्र ताठर होते.असे का होत असेल हस्तमैथुन अति केल्यामुळे अस झालं असेल का?जर हो तर मग सेक्स करतानाच अस का होते बाकी वेळेला म्हणजे झोपेतून उठल्यावर किंवा सोपताना तसेच हस्तमैथुन करताना लिंग ताठर कस काय असते जर प्रोब्लेम असेल तर ते ताठर व्हायलाच नव्हतं पाहिजे.माझं वय आज 30 आहे लग्न करायची पण भीती वाटते आणि पहिल्या वेळी सेक्स करताना अस घडलं म्हणून सेक्स ची भीती पण वाटते की अस पुन्हा झालं तर पुढची व्यक्ती के विचार करेल ?

107
प्रश्नोत्तरेमला 13 वर्षाचा असताना पासून हस्तमैथुन करायची सवय आहे जी मी 26 वर्षापर्यंत रेग्युलर केली, त्यानंतर पहिला सेक्स करताना लिंग ताठर झाले नाही,पण इतर वेळी मात्र ताठर होते.असे का होत असेल हस्तमैथुन अति केल्यामुळे अस झालं असेल का?जर हो तर मग सेक्स करतानाच अस का होते बाकी वेळेला म्हणजे झोपेतून उठल्यावर किंवा सोपताना तसेच हस्तमैथुन करताना लिंग ताठर कस काय असते जर प्रोब्लेम असेल तर ते ताठर व्हायलाच नव्हतं पाहिजे.माझं वय आज 30 आहे लग्न करायची पण भीती वाटते आणि पहिल्या वेळी सेक्स करताना अस घडलं म्हणून सेक्स ची भीती पण वाटते की अस पुन्हा झालं तर पुढची व्यक्ती के विचार करेल ?
Anonymous asked 6 months ago

2 Answers
I सोच answered 5 months ago

मित्रा, सेक्स ही काही लढाई किंवा जंग नाही की जिंकायलाच पाहिजे आणि तेही पहिल्या प्रयत्नांत. सेक्स, लैंगिक संबंध हे एकमेकांच्या आनंदासाठी करायचे असतात त्याचा एवढा ताण, दबाव, प्रेशर मनावर ठेऊ नका.

सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनातील भीती काढून टाका. हेच तुमच्या सर्व प्रश्नांचे सोल्युशन आहे.

तुमच्या प्रश्नातील काही गैरसमाजांविषयी बोलूयात. काही तथ्य आणि शास्त्रीय माहिती जाणून घेतली म्हणजे तुमच्या मनातील भीती आपोआपच कमी होईल.

१. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पहिल्यांदा सेक्स करताना ताठरता आली नाही म्हणजे पुढे कधीच येणार नाही, हा गैरसमज मनातून काढून टाका.

२. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन केल्याने लिंगामध्ये अडथळा येण्यास काहीही अडचण येत नाही.

३. आता आपण हे समजून घेऊया की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी http://letstalksexuality.com/premature-ejaculation/ हा लेख तसेच आपल्या वेबसाईटवरील या समस्येसंबंधित प्रश्न उत्तरे नक्की वाचा.

संभोगाच्या काही पध्दती बदलून शीघ्रपतनाची समस्या दूर केली जाऊ शकते. याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

चिंता सोडा आणि निश्चिंत राहा.

You might also like More from author