माझा प्रॉब्लेम वेगळाय

556
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझा प्रॉब्लेम वेगळाय
प्रश्न asked 3 months ago

मी 25 वर्षांचा आहे. रोज रात्री गादीवर पालथा पडून मी हलत हलत स्वप्न पहात सेक्स करतो. ह्यामुळे मला आनंद मिळतो. हा देखील हस्तमैथुनचाच प्रकार आहे का?? ह्यात काही वेळा स्लखन होते. काही वेळा नाही. स्लखन झाले नाही तरी मला पूर्ण समाधान मिळते असे का?? आणी हे रोज करण्याचे दुष्परिणाम आहेत का??

1 Answers
let's talk sexuality answered 3 months ago

तुमचा प्रॉब्लेम काही वेगळा नाही आहे, हे फार जनरल आहे. स्वत:सोबत जे केल्याने तुम्हाला समाधान मिळते ते तुम्ही करु शकता . तुम्ही करत असलेल्या पद्धतीने तुम्हाला छान वाटत असेल तर त्यात काहीच वावगं नाही. स्लखन होण्यानेच समाधान मिळते असे नाही. न होताही तुम्हाला पूर्ण समाधान मिळते आहे ना मग झालं तर. अन जर शरीराची काळजी घेऊन, स्वच्छता ठेवली, तर मग काही दुष्परिणाम होतील असं नाही वाटत.