मि पती सोबत पोर्न फिल्म पाहीली त्यात तिन मुलीसोबत एकजण वेगवेगळी आसने वापरुन तिन तास सेक्स केला तरिही त्याचे विर्यपतन झाले नाही, हस्तमैथुन करावे लागले. ते सर्व पाहुन आम्ही सेक्स केला तर पतीचे पाच मिनीटातच विर्यपतन झाले असं का झालंं हा प्रश्न नेहमी मला सतावतो प्लिज…मार्गदर्शन करा

412
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमि पती सोबत पोर्न फिल्म पाहीली त्यात तिन मुलीसोबत एकजण वेगवेगळी आसने वापरुन तिन तास सेक्स केला तरिही त्याचे विर्यपतन झाले नाही, हस्तमैथुन करावे लागले. ते सर्व पाहुन आम्ही सेक्स केला तर पतीचे पाच मिनीटातच विर्यपतन झाले असं का झालंं हा प्रश्न नेहमी मला सतावतो प्लिज…मार्गदर्शन करा
komal dage@gmil.com asked 2 weeks ago
1 Answers
lets talk sexuality answered 1 week ago

पॉर्न क्लिप्समधून काही लैंगिक कृती अतिरंजित दाखवल्या जातात. जसं २०-२५ मिनिटं ते काही तास संभोग चालतो. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात असतील असं नाही. पॉर्न इंडस्ट्रीमध्येही तेच दाखवलं जातं ज्यातून त्यांना जास्त नफा कमवता येईल. पॉर्न पहावं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. या बाबत जर आपणाला अधिक माहिती हवी असल्यास या लिंक ला भेट द्या. http://letstalksexuality.com/pornography-feminist-critique/

आता राहिला तुम्ही विचारलेला प्रश्न तर, साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो (तुमच्या म्हणण्यानूसार तुमच्या पतीला 5 मिनिटे लागतात त्यामुळे सगळं नॉर्मल वाटते आहे). अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते. ही अनेक पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे आणि त्यावर निश्चितच उपाय करता येईल त्यामुळे निश्चिंत रहा.

शीघ्रपतनाविषयी सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून लेख वाचा.

http://letstalksexuality.com/premature-ejaculation/ तसेच http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपण आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की, संभोग हा लैंगिक समाधानाचा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे तुम्ही प्रणयक्रीडा (fore play) करता यातूनही जोडीदाराला लैंगिक समाधान मिळू शकते. पण तुमच्या जोडीदाराला लैंगिक समाधान मिळते की नाही हे समजून घेण्यासाठी मनमोकळा संवाद हवा. Fore play विषयी सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून लेख वाचा.

http://letstalksexuality.com/foreplay/