मुलीन लग्णा आधी संबंध ठेवल का नाही हे कसे ओळखाच

1,979
प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमुलीन लग्णा आधी संबंध ठेवल का नाही हे कसे ओळखाच
123 asked 3 years ago

1 Answers
let's talk sexuality answered 3 years ago

मुलीने लग्नाआधी संबंध ठेवला आहे हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. मुलींच्या योनीमार्गात एक लवचिक पडदा असतो, ज्याला हायमेन असं म्हणतात. पहिल्या सेक्सच्या वेळी हा पडदा विलग होतो आणि कधी कधी त्यातून रक्त येतं. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात घ्या. हा पडदा सायकल चालवणं, खेळ, पोहणं, कष्टाची कामं अशा इतरही कारणांनीही फाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या योनीमार्गात हा पडदा असतोच असं नाही आणि तो पहिल्या सेक्सच्या वेळी फाटून रक्त येतंच असं नाही. योनीद्वार फाटलेले आहे म्हणजे कौमार्य भंग झाला आहे किंवा तिने लग्नाआधी संबंध ठेवले असतील, असा समाजात रूढ असलेला समज चुकीचा आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.