योनी

227

योनीमार्गात एकूण किती छिद्रे असतात?आणी मासिक पाळीच्या वेळी रक्त लघवी तसेच बाळ एकाच मार्गाने येतात का?

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

स्त्रीच्या प्रजनन अवयवांची विशिष्ट रचना आहे. योनीचा जो भाग आहे त्यात अगोदर 1. मुत्रमार्ग आहे आणि नंतर 2. योनीमार्ग ज्याला मायांग किंवा बाळवाटही म्हणतात. आणि नंतर आहे 3. गुदमार्ग.
मुत्रमार्गाच्या खालील बाजुस योनीमार्ग असतो. योनीमार्ग योनीद्वारापासून सुरू होतो आणि आत ग्रीवेपाशी (गर्भाशय मुखापाशी) गर्भाशयाला जोडलेला असतो. पाळीचं रक्त इथूनच बाहेर येतं. समागमाच्या वेळी पुरुषाचं लिंग किंवा शिश्न योनीमार्गातच आत जातं आणि बाळाचा जन्मही याच वाटेनं होतो. योनीमार्ग अतिशय लवचिक स्नायूंनी बनलेला असतो. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://letstalksexuality.com/female-body/