लग्नाविषयी : माझे वय 24 वर्षे आहे. मला खूपच लैंगिक इच्छा जानवत आहेत. मी कोणत्याही रिलेशन मध्ये नाही लग्न करावेसे वाटते परंतु कौटुंबिक जबाबदारी मूळे शक्य नाही. मी याविषयी कोणाशीही बोलू शकत नाही. मी काय करावे कृपया मार्गदर्शन करा.

1,184
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलग्नाविषयी : माझे वय 24 वर्षे आहे. मला खूपच लैंगिक इच्छा जानवत आहेत. मी कोणत्याही रिलेशन मध्ये नाही लग्न करावेसे वाटते परंतु कौटुंबिक जबाबदारी मूळे शक्य नाही. मी याविषयी कोणाशीही बोलू शकत नाही. मी काय करावे कृपया मार्गदर्शन करा.
Pp asked 7 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 7 months ago

तू इथं प्रश्न विचारलास हे बरं केलंस. खरंच, आपल्या आयुष्याशी अगदी जवळचा संबंध असलेल्या अनेक गोष्टींविषयी आपण कोणाशीच बोलू शकत नाही. त्यातून सेक्स सारख्या विषयावर तर नाहीच नाही. वयात आल्यावर मनात अशा भावना येणे नैसर्गिक वा स्वाभाविक आहे.
तू सांगितलेस की तुला जोडीदार नाही. जोडीदार नसेल तर लैंगिक इच्छा पूर्तीचा सर्वात सोपा सुरक्षित उपाय म्हणजे हस्तमैथुन. म्हणजेच शरीरातील संवेदनशील आणि लैंगिक अवयवांना स्पर्श करून लैंगिक सुख मिळविणे. आपलं सुख आपल्या हातात ! हस्तमैथुन करण्यात काहीच गैर नाही. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनाविषयी अनेक लेख आणि प्रश्नोत्तरे आहेत ती वाच, तुला शोधणे सोपे जावे यासाठी खाली लिंक देत आहे.
http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
http://letstalksexuality.com/questions-2/
खरंतर परस्पर संमती, आदर, सुरक्षितता (गर्भनिरोधकाचा वापर) आणि खाजगीपणा या गोष्टी लक्षात ठेवून लग्नाआधी देखील लैंगिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. मात्र असा जोडीदार मिळणं आणि दोन्ही बाजूने नात्यातील गोष्टी स्पष्ट असणं गरजेचं असतं. शिवाय यातून नात्यातील गुंतागुंत वाढण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे असे लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर तुझ्या याविषयीच्या (लग्नाआधी लैंगिक संबंध) कल्पना, मते काय आहेत हे तपासून घे आणि विचारपूर्वक योग्य तो निर्णय घे. नाहीतर हस्तमैथुन आहेच.
लग्न कोणी कधी करायचे किंवा करायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त सेक्स साठी घाईघाईनं लग्न करणे तर आजीबात करू नकोस. सेक्स हा वैवाहिक आयुष्यातील महत्वाचा भाग आहे हे जरी खरं असलं तरी सहजीवनामध्ये अनेक गोष्टी असतात. त्यामुळे पुढे जाऊन लग्न करणार असशील तर त्याचाही विचार कर. कदाचित तुझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात साथ देणारा जोडीदार तुला मिळू शकेल. काळजी घे आणि आणखी काही शंका प्रश्न असतील तर नक्की विचार. तुला खूप सदिच्छा !