लिंग डाव्या बाजुस खुपच वाकडे आहे.आयुष्यात कधी संभोग केलेला नाही

1,102
प्रश्नोत्तरेCategory: Private Questionलिंग डाव्या बाजुस खुपच वाकडे आहे.आयुष्यात कधी संभोग केलेला नाही
amit asked 1 year ago

लिंग डाव्या बाजूला खूपच वाकडेआहे.कधी संभोग केलेला नाही.त्या मुळे त्रास होतो का याचा अंदाज नाही.लग्नाच्या अगोदरच काही उपाय करता येईल ?लिंग खूप जास्त वाकडे असेल तर मूल होण्या साठी काही प्रॉब्लेम येऊ शकतो का ?

1 Answers
let's talk sexuality answered 1 year ago

नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही तसेच गर्भधारणा होण्यासाठीही काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना झाल्या तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो. बाकामुळे / वाकडेपणामुळे भविष्यात लैंगिक संबंधांच्या वेळी अडचण येत असेल किंवा वेदना जाणवल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे कारण नाही.

आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरील लेख आणि ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

पुरुषाचं शरीर :- http://letstalksexuality.com/male-body/

प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

http://letstalksexuality.com/question/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D/