शंका

792
रोहित asked 10 months ago

मी 24 वर्षांचा तरुणआहे. मला एक 23 वर्षीय गर्लफ्रेंड आहे. ती गोरी आहे आणि तिची योनी काळी आहे, कसे काय?

1 Answers
let's talk sexuality answered 10 months ago

जसा प्रत्येक व्यक्तीचा रंग किंवा रंगाची छटा वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या लिंगाचा किंवा योनीचा रंगही वेगवेगळा असू शकतो. तुम्ही कोणत्या हवामानाच्या प्रदेशात राहता? तुमच्या शरीराची जनुकीय रचना काय आहे? शरीरात रंगद्रव्याचं प्रमाण कसं आहे? या किंवा अशा अनेक गोष्टींवरुन तुमच्या शरीराच्या त्वचेचा रंग ठरत असतो. शरीरातील रंगद्रव्ये मुख्यत्वे अनुवांशिकरित्या येतात. ही रंगद्रव्ये हवामानातील बदलामुळं काही पिढ्यांनतर बदलू शकतात. रंगद्रव्यातील मेलॅनिन रसायनाच्या मात्रेवरुन त्वचेचा रंग बदलत जातो. लिंगाच्या आणि योनीच्या रंगाचंदेखील असंच आहे.

लिंग आणि योनी शरीराच्या एका ठराविक भागामध्ये आहेत. शरीराच्या तापमानापेक्षा इथलं तापमान थोडं वेगळं असतं. त्यामुळं शरीराच्या त्वचेपेक्षा लिंगाचा किंवा योनीचा रंग वेगळा असू शकतो. तुम्ही शरीराची अधिक पाहणी केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या तळपायाचा रंग आणि पायाच रंग हा देखील वेगळा आहे.

अनेकवेळा पॉर्न क्लिप्स किंवा ब्लू फिल्म पाहून पुरुषांच्या काही कल्पना तयार होतात. परंतू हे नेहमी लक्षात ठेवा, पॉर्न क्लिस या कल्पनारंजन करुन बनवलेल्या असतात. शिवाय अनेकवेळा त्यात दाखवलेले लिंगाचे किंवा योनीचे आकार, रंग तितकेसे खरे नसतात. त्यामुळं अशा क्लिप्स पाहून मनामध्ये कोणताही न्यूनगंड किंवा अहंकार तयार करण्याची गरज नाही. रंग कोणताही असला तरी प्रेम तेच असतं. त्यात काही फरक पडत नाही.