पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.
गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी http://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.
गर्भधारणा टाळण्यासाठी पाळी सुरु झाल्यापासून १० ते २० दिवस संबंध ठेवू नयेत असे बऱ्याचदा सुचवलं जातं, पण इतर दिवसांमध्ये गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन संबंध ठेवताना निरोधचा वापर हा गर्भधारणा टाळण्यासाठी सोपा व सुरक्षित उपाय आहे.
आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे. http://letstalksexuality.com/question/
Please login or Register to submit your answer