संभोग

454
Rahul asked 1 year ago

माझे वय 24 असून माझ्या काकूंचे वय 43 आहे. मला माझी काकू संभोग करण्यास प्रेरित करते आहे. तरी मी संभोग करताना काय काळजी घ्यावी?

1 Answers
lets talk sexuality answered 1 year ago

मित्रा, लैंगिक इच्छा आणि प्रत्यक्ष कृती यात फरक आहे. सेक्स ही एक जबादार क्रिया आहे हे विसरू नकोस. लैंगिक कृतीमध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि आदर तितकाच महत्वाचा आहे. जरी काकूची तशी इच्छा असेल आणि तिने ती व्यक्त केली तरीही खालील गोष्टींचा दोघं मिळून विचार करा. तुला काय वाटते? तुमच्या दोघांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे याचा विचार करून मग निर्णय घ्या.

१. उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका.

२. या लैंगिक संबंधांमुळे तुमच्या काकुच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.

३. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

४. नको असलेली गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार होऊ नयेत म्हणून कंडोमचा वापर आवश्यक आहे.

जे काही कराल ते परस्पर संमतीने आणि जबाबदारी घेऊनच करा.