सतत सेक्स कल्याने योनी सैल होते का महीन्यातुन किती वेळा सेक्स करावा

956
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसतत सेक्स कल्याने योनी सैल होते का महीन्यातुन किती वेळा सेक्स करावा
rashmi kale@gmi.com asked 8 months ago

*

1 Answers
let's talk sexuality answered 8 months ago

नाही. जास्त सेक्स आणि योनीमार्ग सैल होणे याचा काहीही संबंध नाही. शास्त्रीयदृष्ट्या असे काही सिद्ध झाले नाही. जास्त सेक्स केल्याने योनीचा आकार वाढत नाही किंवा योनी फाकली जात नाही. योनी ही निसर्गतः लवचिक असते. निसर्गतः योनी गरजेनुसार सैल किंवा घट्ट होते. जेव्हा स्त्री लैंगिक दृष्ट्या उत्तेजित होते त्यावेळी लैंगिक संबंध सुखकर व्हावेत म्हणून निसर्गतः योनीचा आकार वाढतो आणि सेक्सनंतर तो मुळ स्थितीमध्ये येतो.

योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत होते. याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

http://letstalksexuality.com/kegel-exercise/