सासू जावई यांच्यात sex संबंध असणे हे योग्य आहे का?

2,698
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसासू जावई यांच्यात sex संबंध असणे हे योग्य आहे का?
Anand Gote asked 9 months ago

1 Answers
let's talk sexuality answered 9 months ago

कुणावर प्रेम असण्यात, तशी भावना, ओढ असण्यात, एखाद्या व्यक्तीबद्दल प्रकर्षाने जाणवण्यात वावगे काही नाही. पण आपली ही जी भावना आहे ती नेमकी काय आहे, ती निरपेक्ष आहे की या नात्याकडून काही अपेक्षा आहेत, तसेच स्वतःला ही भावना व्यक्त करण्यातून काय साध्य करायचे आहे या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे. विशेषतः सासूशी जावई म्हणून असलेले नाते पाहता; हे प्रेम आणि प्रेमाची हवी असलेली अभिव्यक्ती जोडीदारासोबतच्या नातेसंबंधात अनेक अडचणी निर्माण करू शकते. यामध्ये जोडीदाराची प्रतिक्रिया काय असू शकते, तसेच जोडीदाराशी असलेल्या नात्यावर काय परिणाम होऊ शकतात याचाही विचार करणे गरजेचे आहे. अनेकदा माणसं कोणाला काही कळणार नाही, कळू द्यायचे नाही अशा पद्धतीने आपले नाते संबंध तयार करतात, परंतु यामध्ये खूप धोके निर्माण होऊ शकतात.