सेक्स समस्या

207
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स समस्या
Ok asked 5 months ago

सर माझे लिंगाची कातडी मला सेक्स करताना मागे सरकत नाही व हाताने सरकवली पुढे येते

1 Answers
lets talk sexuality answered 5 months ago

तुमच्या प्रश्नासम अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्या वेबसाईट वर आहेत ते वाचा. लिंगावरची त्वचा मागे जात नसेल तर समस्या होईलच असं नाही. अनेकवेळा लैंगिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिंगावरची त्वचा मागे जाताना थोडाफार त्रास होऊ शकतो. परंतु हळूहळू हा त्रास कमी होत जातो आणि लिंगावरची त्वचा मागे जायला सुरुवात होते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता त्रास होत असेल तर अशी त्वचा छोटी शस्त्रक्रिया करुन काढून टाकता येते. याला सुंता करणं असं म्हटंल जातं. मात्र यासाठी तज्ञ डॉक्टरांचीच मदत घ्यावी. कारण शस्त्रक्रियेमध्ये स्वच्छता महत्वाची असते. अन्यथा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सुंता करणे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

  1. http://letstalksexuality.com/male-circumcision/
  2. http://letstalksexuality.com/question/

    3.http://letstalksexuality.com/question/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A1/