स्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्या नंतर स्रीची गर्भधारणा होते काय?

4,648
प्रश्नोत्तरेस्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्या नंतर स्रीची गर्भधारणा होते काय?
Anonymous asked 4 years ago
1 Answers
let's talk sexuality answered 4 years ago

मासिक पाळी येणं बंद झाल्यावर गर्भधारणा राहू शकत नाही. कारण गर्भधारणा होण्यामध्ये मासिक पाळी खूप महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. मासिक पाळी दर महिन्याला येते. दोन मासिकपाळ्यामधील कालावधीला ‘मासिकपाळीचे चक्र’ असे म्हणतात. या चक्राच्या कालावधीत बीजकोषातून एक स्त्रीबीज बाहेर टाकले जाते आणि याच काळात गर्भाशयात रक्ताचे अस्तर/थर गर्भाच्या पोषणासाठी जाड बनू लागते. या दरम्यान स्त्री-पुरुषाचा समागम झाल्यास स्त्रीबीजाचे पुरुषबीजाशी (शुक्राणू) मिलन होऊन स्त्रीबीज फलित होते. म्हणजेच गर्भधारणा होते. गर्भाशयात तयार झालेले रक्ताचे अस्तर/थर गर्भाच्या वाढीसाठी उपयोगात येतो. त्यावरच गर्भाशयात गर्भाचे पालनपोषण होत असते. शरीरातील संप्रेरके मासिक पाळीचे नियंत्रण करत असतात. मासिक पाळी बंद झाल्यानंतर ही संप्रेरके काम करेनाशी होतात. मासिक पाळी बंद झाल्यानंतर गर्भधारणा राहू शकत नाही.