हस्तमैथुन

541

मी आठवड्यातुन 3-4वेळा हस्तमैथुन करतोय असे 4 वर्ष झालीत त्यामुळे मी बाप बनण्यात काही समस्या येतील का ?

1 Answers
let's talk sexuality answered 3 months ago

तुम्ही करत असलेल्या कृत्यामुळे भविष्यात तुमचं खूप मोठं नूकसान होणार आहे, तुम्ही भयानक पाप करत आहात, एवढ्या वेळा हस्तमैथुन केल्याने लिंगालाही त्रास होईल, तुमच्या आतमध्ये असलेले वीर्य संपून जाईल, लग्नानंतर लिंगाला ताठरपणा येणार नाही, तुम्ही बाप बनु शकणार नाही. या प्रकारच्या समस्या ह्या सतत हस्तमैथुन केल्याने येऊ शकतात. असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला असं कुणी सांगत असेल तर हे धादांत खोटं व चुकीचे आहे. कारण हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. उलट हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही, लिंग वाकडे होते, वीर्य वाया जातं, मुल होत नाही, हे सर्व गैरसमज आहेत. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.

वेबसाईटवर आत्तापर्यंत या विषयाबाबत खूप चर्चा झाली आहे व त्याबाबत काही लेख व ऑडिओ पॉडकास्ट आपण तयार केलेले आहेत. त्याच्या लिंक सोबत देत आहोत.

http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

ऐकण्यासाठी

http://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/

http://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/

वाचून व ऐकूण मनातील सगळे गैरसमज दूर होतील अशी आशा आहे.