प्रश्नोत्तरेCategory: Public Questions………………………….आवाहन आमच्या वेबसाईटवरच्या वाचक मित्र – मैत्रिणींना…………………….

आपल्या सर्वांच्या मनात लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्न असतात ते विचारण्यासाठी वेबसाईट ही एक चांगली जागा आहे. अनेकजण आपल्या मनातील प्रश्न मोकळेपणाने विचारतात आणि आम्हीही त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला खूप उत्सुक असतो. परंतु मागच्या काही महिन्यात आमच्या असे लक्षात आले आहे की, काहीजण प्रश्न विचारताना काल्पनिक स्थिती समोर ठेवून किंवा खोट्या  लैंगिक कल्पना निव्वळ लैंगिक मनोरंजनासाठी प्रश्न विचारतात. असे प्रश्न रुचीहीन भाषेत तर असतातच परंतु अनेकदा ते समोरच्याला अस्वस्थ करणारे किंवा कधी कधी अपमानित करणारे वाटतात. अनेकदा लैंगिक अवयवांसाठी शिव्यात वापरले जाणारे शब्द, टर्म्स वापरल्या जाताना दिसतात. त्यापेक्षाही अधिक म्हणजे प्रश्नांचा रोख हा स्त्रिया आणि मुलींच्या लैंगिकतेचा अपमान करणारा किंवा त्यांच्या लैंगिक अधिकारांचं हनन करणारा असतो. जी मूल्य घेऊन ही वेबसाईट चालवली जाते त्या मुल्यांचा उदा. समानता, विविधता, संमती आणि सुरक्षितता, अधिक्षेप करणारे प्रश्न असतात.

आपण स्त्रियांच्या शरीराकडे एक ‘उपभोग वस्तू‘, म्हणून बघतो की त्या ही एक माणूस आहेत या भावनेने आणि आदराने बघतो? तसे वागतो का?  हे आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे. आपण जाणूनबुजून अशा शब्दांचा वापर करतो आहोत का? आपण स्त्रीच्या लैंगिक अवयवांसाठी  शिव्यामधील शब्दांचा वापर टाळून इतर बोली भाषेतील शब्द जसं मायांग, बाळवाट अशा किवा शास्त्रीय शब्द जसं योनी, लिंग यांचा वापर करू शकलो तर उत्तम

आम्ही सर्व आपल्याला आवाहन करत आहोत की, अशा पद्धतीने कृपया प्रश्न विचारू नयेत. आपल्या सर्वांच्या खऱ्या, प्रामाणिक प्रश्नांना आम्ही उत्तर देणारच आहोत, देतंच आहोत.

मुख्यत: या वेबसाईटचा उद्देशच हा आहे की, या वेबसाईटचे जे वाचक आहेत, विशेषतः तरुण मुल-मुली, त्यांच्याशी लैगिकतेसंदर्भात कुल्याही विषयावर अतिशय मोकळेपणाने, वैज्ञानिक पद्धतीने आणि संवेदनशील पद्धतीने लैंगिकतेची जी मूल्य आपण मानतो, त्या मुल्यांचा आधार घेऊन संवाद साधणे. त्यामुळे आपल्या सर्वाना अशी विनंती आहे की, कृपया या वेबसाईटचा उपयोग अशा चुकीच्या कारणांसाठी न करता खरंच आपल्याला काही समस्या असेल किंवा आपल्याला काही शेअर करायचे किंवा मांडायचे असेल तर त्यासाठी करावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी