प्रश्नोत्तरेदोघांनाही खुप वेळ सेक्स करावा वाटतो पन लिंग ताईट जास्त वेळ राहत नाही काही ऊपाय आहेत काय सांगा
Mandar Muley replied 11 months ago

सेक्स टाइम्स वाढवण्यासाठी काय करावे

2 उत्तर

मुळात जास्त वेळ संभोग केला म्हणजे जास्त आनंद मिळतो हा आपल्या समाजात सर्रास आढळणारा गैरसमज आहे. सेक्स ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. यामध्ये जोडीदाराबरोबर योग्य तो संवाद होणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची शरीरं, एकमेकांच्या लैंगिक इच्छा, अपेक्षा समजून घेणं खूप महत्वाचं असतं.

प्रत्येकाचा संभोग करण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. दुसर्याासोबत तुलना करणं चुकीचं ठरेल. दोन्हीही जोडीदारांच्या उत्कटेच्या पातळीवर संभोग क्रियेचा कालावधी अवलंबून असतो. अनेकवेळा संभोगाचा अर्थ फक्त लिंग योनीमध्ये टाकणं एवढाच घेतला जातो. खरतरं संभोगापूर्वीचा प्रणय देखील तितकाच महत्वाचा असतो. पण याकडं बरेचवेळा दुर्लक्ष केलं जातं.

बाजारात संभोग कालावधी, सेक्स stamina किंवा पॉवर वाढवण्याच्या नावावर विकली जाणारी अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणं धोकादायक ठरू शकतं. व्यायाम, योग्य आहार आणि मन आनंदी राहील अशा कृतींमुळे तुम्ही निरोगी राहू शकता. आणि तुमची तब्येत चांगली असेल तर सेक्समध्येही तुम्हाला जास्त आनंद मिळू शकेल. शरीरातलं रक्ताभिसरण सुरळित असेल तर लिंगाचा ताठरपणा आणि इतर क्रिया सुलभपणे होतात. सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठीची औषधं आजारावर उपाय म्हणून वापरली जातात. ज्यांना लिंगामध्ये ताठरपणा येत नाही त्यांच्यासाठी अशा औषधांचा उपयोग होतो. तशी काही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सांगितलेल्या प्रमाणातच औषधं घ्या. लिगांचा ताठरपणा किंवा शीघ्रपतन याबाबत काही समस्या नसेल तर औषधं घेण्याची गरज नाही.

पॉर्न क्लिपमधून दाखवलेला जास्त कालावधीचा संभोग हा कृत्रिम असतो. पण अशा जास्त वेळ चालणार्याू संभोगाच्या क्लिप्स पाहून मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. याला छेद देणं आवश्यक आहे. जोडीदारामधील उत्तम परस्पर समजुतदारपणा संभोग क्रियेचा कालावधी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. बधीरता आणणारी विशिष्ट औषधे शिश्नावर लावली तर शिश्नाची संवेदना घटल्याने वीर्यपतन विलंबाने होऊ शकते. परंतु सामान्यतः हे लक्षात ठेवणं चागलं की औषधी उपायांपेक्षा जोडीदारांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हा उत्तम पर्याय आहे.

याविषयीचे अनेक प्रश्न वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 17 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी