प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझ्या गर्लफ्रेंड ला मासिक पाळी महिन्याच्या ५-७ दिवस आधी येते गेल्या ५ महिन्यापासून असेच सुरू आहे आणि अंगावर फक्त एक च दिवस जाते पाळीमध्ये साधारणता 3 दिवस अंगावरून जाणे अपेक्षित असते पण अस तिच्यासोबत होत नाही आणि हे एक दिवस अंगावर तिला ती वयात आल्यानंतर 1 वर्षांनी सुरू झाले पहिल्या वर्षी बरोबर 3 दिवस आंगावर जायचं म्हणे आज तीच वय 22 आहे आणि तुच्या अंगावर केस खूप आहेत हे सगळं हार्मोन्स changes मूळे होत असेल का ? आणि याचा तिच्या लैंगिक जीवनावर काही pregency वर काही परिणाम होऊ शकतो का भविष्यात? आणि हो ती अजून व्हर्जिन आहे आम्ही या गोष्टी लग्ना नंतरच करायच्या अस ठरवलंय तर माझ्या या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती द्या प्लीज.
माझ्या गर्लफ्रेंड ला मासिक पाळी महिन्याच्या ५-७ दिवस आधी येते गेल्या ५ महिन्यापासून असेच सुरू आहे आणि अंगावर फक्त एक च दिवस जाते पाळीमध्ये साधारणता 3 दिवस अंगावरून जाणे अपेक्षित असते पण अस तिच्यासोबत होत नाही आणि हे एक दिवस अंगावर तिला ती वयात आल्यानंतर 1 वर्षांनी सुरू झाले पहिल्या वर्षी बरोबर 3 दिवस आंगावर जायचं म्हणे आज तीच वय 22 आहे आणि तुच्या अंगावर केस खूप आहेत हे सगळं हार्मोन्स changes मूळे होत असेल का ? आणि याचा तिच्या लैंगिक जीवनावर काही pregency वर काही परिणाम होऊ शकतो का भविष्यात? आणि हो ती अजून व्हर्जिन आहे आम्ही या गोष्टी लग्ना नंतरच करायच्या अस ठरवलंय तर माझ्या या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती द्या प्लीज. asked 7 years ago

2 उत्तर
Answer for माझ्या गर्लफ्रेंड ला मासिक पाळी महिन्याच्या ५-७ दिवस आधी येते गेल्या ५ महिन्यापासून असेच सुरू आहे आणि अंगावर फक्त एक च दिवस जाते पाळीमध्ये साधारणता 3 दिवस अंगावरून जाणे अपेक्षित असते पण अस तिच्यासोबत होत नाही आणि हे एक दिवस अंगावर तिला ती वयात आल्यानंतर 1 वर्षांनी सुरू झाले पहिल्या वर्षी बरोबर 3 दिवस आंगावर जायचं म्हणे आज तीच वय 22 आहे आणि तुच्या अंगावर केस खूप आहेत हे सगळं हार्मोन्स changes मूळे होत असेल का ? आणि याचा तिच्या लैंगिक जीवनावर काही pregency वर काही परिणाम होऊ शकतो का भविष्यात? आणि हो ती अजून व्हर्जिन आहे आम्ही या गोष्टी लग्ना नंतरच करायच्या अस ठरवलंय तर माझ्या या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती द्या प्लीज. answered 7 years ago

१. प्रत्येकीचं पाळी चक्र वेगवेगळं असतं. हे २२ ते ३४ दिवसांचं असू शकतं. तुमचं पाळीचक्र २४ ते २५ दिवसांचं आहे असं दिसतंय. यात काळजी करण्यासारखे काहीच नाही.

२. पाळीच्या काळात साधारणपणे २ ते ४ चमचे म्हणजेच ३० ते ६० मिलीलीटर रक्त जातं. ३ ते ७ दिवस रक्तस्राव होतो पण यात काळजी करण्यासारखं काहीच नाही. नियमितपणे तितकेच रक्त जात असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळे गर्भधारणेस अडचण येणार नाही. तरीही शंका निरसन करण्यासाठी एखाद्या स्त्री-रोग तज्ञांचा सल्ला घ्या.

३ . आता बोलूयात अंगावरील केसांबद्दल. आपल्या शरीरात काही ग्रंथी आहेत ज्या विशिष्ट संप्रेरकं निर्माण करतात. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतात. या संप्रेरकांची जर योग्य प्रमाणात निर्मिती झाली किंवा गरजेपेक्षा जास्त झाली, तर त्याचा शरीरावर, प्रजनन कार्यावर आणि लैंगिक इच्छांवर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये अँड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारं प्रोजेस्टेरॉन) चं प्रमाण वाढलं किंवा काही कारणास्तव त्यांनी इंजेक्शनवाटे घेतलं (उदा. वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. आवाज बदलणं चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हनुवटी, चेहरा व अंगावर जास्त प्रमाणात केस येणं तसेच अनियमित मासिक मासिक पाळी किंवा मासिक पाळी न येणं, लैंगिक इच्छांमध्ये बदल, लैंगिक इच्छांमध्ये वाढ, असे काही बदल दिसतात. अँड्रोजनचे किती प्रमाणात वाढले आहे त्यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते.

४. स्त्रीच्या शरीरात किती प्रमाणात अँड्रोजन हॉर्मोन/संप्रेरक वाढले आहे त्यावर तिच्या लैंगिक आयुष्यावर काय परिणाम होतो हे अवलंबून असेल. त्यामुळे वर नमूद केलेले बदल जर जास्त प्रमाणात दिसून आले तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 15 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी