प्रश्नोत्तरेमाझ्या शरीरात हार्मोन्सची कमतरता आहे ती कशी पुर्ण करता येईल

1 उत्तर

तुमचा प्रश्न वाचल्यावर आणखी एक प्रश्न निर्माण झाला की तुमच्या शरीरात हार्मोन्सची कमतरता आहे, हे तुम्हाला कसे कळाले? तुम्हाला तशी काही लक्षणे दिसली की तुम्हाला हे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले? याचे उत्तर तुम्हाला माहित असावे अशी अपेक्षा.
हार्मोन्सला मराठीत संप्रेरक असं म्हणतात. आपल्या शरीरातील हायपोथॅलॅमस, पिच्युटरी, अॅड्रेनल या ग्रंथीमध्ये आणि वृषण (पुरुषांमध्ये) आणि स्त्री बीजकोष (स्त्रियांमध्ये) या अवयवांमध्ये संप्रेरकं तयार होत असतात. पुरुषांमध्ये अॅड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारे टेस्टेस्टेरॉन) आणि काही अंशी इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके असतात. जर काही कारणांनी पुरुषांमध्ये या संप्रेरकांची घट/कमतरता निर्माण झाली तर लैंगिक इच्छा कमी होतात, अंगावरचे केस कमी होतात व स्तनांची वाढ होते. जर रक्तात याचं प्रमाण खूप कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधावाटे ते शरीराला पुरवता येतं.   
इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांची निर्मिती बहुतांशी स्त्री बीजकोषात होते व थोड्या अंशी अॅड्रेनल ग्रंथीमध्ये होते. स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र या संप्रेरकांवर अवलंबून असतं. जर ठराविक वेळी ही संप्रेरकं  पुरेशा प्रमाणात तयार झाली नाहीत, तर पाळीच्या चक्रात बदल होतो व गर्भधारणेस अडचण येऊ शकते. अशा वेळी संप्रेरकांचं समतोल निर्माण करणारी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतील.               
हा प्रश्न स्त्रीने विचारला आहे की पुरुषाने हे प्रश्नातून समजत नसल्यामुळे दोघांच्या संदर्भात उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. दिलेले उत्तर तुम्हाला उपयुक्त असे नसेल तर कृपया तुम्हाला शरीरात हार्मोन्सची कमतरता आहे, असे का वाटते? काही विशिष्ट लक्षणे आढळतात का? त्या पद्धतीने माहिती दिलीत तर नेमके उत्तर देणे शक्य होईल. प्रतिसादाच्या अपेक्षेत…

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 20 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी