प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ लग्न होऊन पण मला मूलींच अाकर्षण अाहे मूलगी पाहिली कीबोलाव वाटतय पण भिती वाटतेकाय कराव?

1 उत्तर

तुमच्या प्रश्नातून तुमचा नेमका प्रश्न समाजत नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तुम्ही स्त्री आहात पुरुष की ट्रान्सजेन्डर? तुमचे लैंगिक अवयव लिंग-पेनिस आहे योनी की नक्की कोणते आहे ते लक्षात आले नाही? तुमचे लग्न स्त्रीशी झाले आहे की पुरुषाचे? यांसारखी काही माहिती दिली तर थोडी स्पष्टता येईल आणि उत्तर देणे सोप्पं जाईल.

पुण्यात समपथिक नावाची संस्था समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी अनेक कार्यक्रम राबविते आणि

त्यांच्या अधिकारांचे मुद्दे घेऊन काम करते. तुम्हाला तिथे सर्वप्रकारची मदत मिळेल. बिंदुमाधव खिरे ती संस्था चालवितात. आणि या विषयावर संवेदनशीलपणे मुलभूत काम करणाऱ्या भारतातील काही लोकांपैकी ते आहेत. तुम्हाला त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलताही येईल. ९७६३६४०४८० त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे. सोमवारी संध्याकाळी ८-९ या वेळेत फोन करा.

लैंगिक ओळख (स्त्री, पुरुष, ट्रान्सजेन्डर), लैंगिक कल (समलिंगी, उभयलिंगी, विरुद्धलिंगी) याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लेख आणि वेबसाईट वरील ‘सगळं नॉर्मल आहे’ हा सेक्शन वाचा.

https://letstalksexuality.com/sexual-orientation-and-diversity/

https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 9 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी