स्तन asked 8 years ago

दोन्ही स्तनामधील लहान मोठेपना

1 उत्तर
Answer for स्तन answered 8 years ago

निसर्गतःच स्त्रीच्या स्तनांच्या आकारात थोडासा फरक असतो. म्हणजेच एक स्तन दुसऱ्या स्तनापेक्षा लहान किंवा मोठा असू शकतो. यात काळजी करण्यासारखे काहीही नाही. मुली किशोरवयात येताना ते तारुण्यावस्था प्राप्त होईपर्यंत स्तनांची वाढ होत असते. स्तन हे चरबीयुक्त स्नायुंपासून बनलेले असतात या स्नायूंमध्ये दुग्धग्रंथी असतात. गरोदरपणा, प्रकृती तसेच वाढते वय यानुसार स्तनांचा आकार व स्वरूप बदलत असते. याविषयी अनेक गैरसमजुती दिसून येतात जसे की दाबल्यामुळे किंवा इतर औषधे खाल्यामुळे स्तन मोठे होतात. मात्र यात काही तथ्य नाही. स्तन छोटे असावेत की मोठे याचे काहीही मापदंड नाही. अनेकदा मोठ्या स्तनांचा संबंध लैंगिक सुखाशी जोडला जातो. लैंगिक सुखामध्ये स्तनांचा आकार महत्वाचा नसून लैंगिक क्रियेतील आपली रुची, आवड किंवा लैंगिक सुख देण्या- घेण्याची संवेदनशीलता महत्वाची असते. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 15 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी