लिंगाला ताठरता आली की लिंगातून लाळेसारखा चिकट पदार्थ बाहेर येतो?

724
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंगाला ताठरता आली की लिंगातून लाळेसारखा चिकट पदार्थ बाहेर येतो?
Sex talk asked 1 year ago
1 Answers
let's talk sexuality answered 1 year ago

हो, लिंगाला ताठरता आली की लिंगातून लाळेसारखा चिकट पदार्थ बाहेर येतो.
लिंगाच्या मुळाजवळ दोन कौपरग्रंथी असतात. त्यांच्यात एक पारदर्शक स्त्राव तयार होत असतो. संभोगाचे, लैंगिक कृतींचे विचार मनात आले म्हणजे थोड्क्यात लैंगिक भावना मनात आल्यावर वीर्यपतन व्हायच्या अगोदर या ग्रंथीतल्या स्त्रावाचे एक – दोन थेंब लिंगातून बाहेर येतात, याला प्रीकम म्हणतात.
या स्त्रावामुळे शिश्नमुंड ओलसर होते, तसेच लघवी करण्यासाठी व वीर्यउत्सर्जन करण्यासाठी एकाच नळीचा (urethra ) उपयोग होत असतो. या नळीत लघवी शिल्लक असू शकते, लघवी acidic असते, हा आम्लपणा घालवण्याचे कामही हा स्त्राव करतो व त्यामुळे वीर्यातील पुरुषबीजांचे संरक्षण होते.
लिंगाबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
http://letstalksexuality.com/male-body/
तुम्हाला असे खूप प्रश्न पडू शकतात. आम्ही तुमच्या सारख्या मित्रांसाठी आधीच खूप प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. सोबतच्या लिंकवर जा अन एकदा वाचुन घ्याल. अन जर त्यामध्ये तुमचे उत्तर नाही मिळाले तर आम्हाला विचारा.
http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/