Aids nasalelya anek mulin barobar sex kelyavar aids hoto ka?

194
प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsAids nasalelya anek mulin barobar sex kelyavar aids hoto ka?
1 Answers
I सोच answered 1 week ago

लैंगिक संबंधांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला एच आय व्ही ची लागण नसेल तर एच आय व्ही/ एड्स चा धोका नसतो. परंतू, कोणत्याही व्यक्तीकडे बघून सांगता येत नाही की, ती एच आय व्ही बाधित आहे की नाही? सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोम चा वापर हा योग्य पर्याय आहे. एच आय व्ही ची लागण झाली आहे की नाही हे समजण्यासाठी एच आय व्ही ची वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.

एका वेळी अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध येत असतील आणि त्यापैकी कोणाला एच आय व्ही आहे की नाही हे माहिती नसेल तर एच आय व्ही होण्याचा धोका असतो. म्हणूनच सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोम चा वापर करणे कधीही चांगले. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

http://letstalksexuality.com/hiv_aids/

You might also like More from author