sex kasa karva asked 8 years ago

1 उत्तर
Answer for sex kasa karva answered 8 years ago

दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध म्हणजे सेक्स. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये प्रवेश करणे. यासोबतच मुखमैथुन, गुदामैथुन हेही संभोगाचे इतर काही प्रकार आहेत. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जास्त जवळ जावंसं वाटत असतं किंवा जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झालेले असता तेव्हा तुम्ही सेक्स करता किंवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. सेक्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी. सेक्स करताना सर्वप्रथम दोन्ही जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 13 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी