प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSir prasuti nanatar amhi yek week madhe sex kela.dusarya divashi mi tila "i pill" dili mag ti tarihi preganat rahu shakate ka ???

Sir prasuti nanatar amhi yek week madhe sex kela.dusarya divashi mi tila "i pill" dili mag ti tarihi preganat rahu shakate ka ???

1 उत्तर

शक्यता खूप कमी आहे. प्रसुतीनंतर अन्डोत्सर्जन व्हायला सहसा तीन ते चार तरी आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यातही बाळ अंगावर पीत असेल तर अन्डोत्सर्जन लांबते आणि पाळी सहसा येत नाही. त्यामुळे अशा स्थितीत बाळंतपणानंतर इतक्या लवकर गर्भधारणेची शक्यता नसते. पण खात्री देता येत नाही.

परंतू बाळंतपणानंतर लैंगिक संबंध ठेवण्यात घाई न करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अनेक कारणांसाठी गरजेचे असते. नुकत्याच प्रसव वेदनेतून गेल्यानंतर स्त्रीची शारीरिक आणि मानसिक स्थिती संबंधांसाठी योग्य असेलच असे नाही. बाळ जन्म ही खूप दमवणारी गोष्ट आहे हे पुरुषांनी समजून घेणे गरजेचे आहे. शिवाय गर्भनिरोधनाचा विचार न करता केलेल्या असुरक्षित लैंगिक संबंधाचा तणावही अनेकदा बाईलाच सहन करावा लागतो. जोडीदार म्हणून तुम्ही अधिक जबाबदारीने वागू शकता. आय पिल हा काही त्यावरील उपाय नाही. आय पिल सारख्या इमर्जन्सी स्थितीत वापरायच्या गर्भ निरोधक उपायांचा स्त्रीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

खाली काही लिंक्स देत आहोत. त्या वरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/sex-after-delivery/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 8 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी