मंदिरात चिमुरडीवर सामूहिक बलात्कार-हत्या

0 58

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील घटना. १० जानेवारी रोजी कठुआ बकरवाल समुदायाची एक आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. पोलीस तक्रारीत म्हटलेय, आरोपीने घोडे शोधण्यासाठी मदत करण्याच्या बहाणाच्या मुलीचे अपहरण केले. या मुलीला देवळात बांधून ठेवण्यात आले. तिला बेशुद्ध करण्यासाठी औषध पाजण्यात आले. १७ जानेवारीला एका झुडपात तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी सांजी रामसह ८ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. चार्जशीट दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्याचा आरोपी संजीराम, त्याचा मुलगा विशाल आणि भाच्याला अटक केलीय.

या प्रकरणाच्या चौकशी निगडीत विशेष पोलीस अधिकारी दीपक खजूरिया, सुरिंदर कुमार, प्रवेश कुमार, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज यांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. यावर देशभरातून प्रतिक्रया उमटत आहेत. सोशल मीडियावर प्रतिक्रिया वाढू लागल्या आहेत. यातच मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

बातमी साभार – न्यु मराठी इन

बातमी लिंक –  https://newmarathi.in/2018/04/15/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9C/

चित्र साभार – https://hi-in.facebook.com/Aitheyenti/posts/387502694992853

Leave A Reply

Your email address will not be published.