बलात्कार पीडित लहान मुलांचे कशाही स्वरुपातील फोटो दाखवू नये: सुप्रीम कोर्ट

137

माध्यमांनी (वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या) बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र दाखवू नये, तसेच चेहरा ब्लर केलेले किंवा मॉर्फ केलेले छायाचित्रदेखील वापरु नये, तसेच त्यांची मुलाखतही घेऊ नये, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतिगृहात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वसतिगृहातील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी माध्यमांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.जवळपास ३० मुलींवर बलात्कार करण्यात आला असून या घटनेने बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी बिहार बंदची हाक देण्यात आली असून सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची स्वत:हून गुरुवारी दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने बिहार सरकार, महिला व बालकल्याण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. बिहार सरकारने यासंदर्भात तपास अहवाल कोर्टात सादर करावा, असे कोर्टाने सांगितले.

बातमी साभार :https://www.loksatta.com/desh-videsh-news/dont-publish-blurred-images-of-rape-victims-supreme-court-muzaffarpur-shelter-sexual-abuse-1724214/

चित्र साभार : https://hindi.news18.com/bihar/

Comments are closed.