सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ३ – बोल की लब आजाद है तेरे – उत्तरार्ध 

आज सिझन २ मधला तिसरा भाग : बोल की लब आजाद है तेरे – उत्तरार्ध यामध्ये समाज माध्यमांवर चालू असणाऱ्या #मीटू चळवळीबाबतच्या अनेक प्रश्नांवर गप्पा मारण्यासाठी साधना खटी व शंकर मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता मागचा भाग कधी संपला कळलंच नाही. याच गप्पा पुढे चालू राहणार आहेत, पण या गप्पांमध्ये फोनच्या माध्यमातुन अजुन दोन मैत्रिणी या भागात आपल्यासोबत सहभागी होत आहेत.

या भागामध्ये
– सहज म्हणून चेष्टा मस्करी करणे (क्यॅज्युअल फ्लर्ट) आणि लैंगिक छळ यात काही फरक असतो का? असावा का? हा फरक कोण आणि कसा ठरवणार?
– पुरुषांनी नकाराचा स्विकार करणे का गरजेचे आहे?
– आणखी एक कळीचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तो म्हणजे संमतीचा. मुली अशा ठिकाणी जातातच का? तिला कल्पना जर होती की आपल्यासोबत असे काही होईल तर ती का गेली? तिने स्पष्ट नको का म्हटले नाही?
– या चळवळीमुळे गोंधळलेल्या किंवा भीती वाटणाऱ्या पुरुषांचं काय? व असा आवाज उठवणाऱ्या किंवा तसे धैर्य दाखवू इच्छिणाऱ्या महिलांचं पुढे काय?
– ग्रामीण, दलित महिला वा असंंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यांच्या मीटू चं काय?  
– मी टू च्या माध्यमातून अनेक मुली आणि महिलांनी आपल्यावरील अन्यायाला जाहीर वाचा फोडली आहे. अनेकजणी कायद्याची मदत घेतील किंवा अनेकींना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. याचा त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होईल? विशेषतः काही घटना घडून अनेक वर्षेही झाली आहेत, पुरावे कसे देणार? 
असे अनेक प्रश्न या पॉडकास्टमध्ये चर्चेला आलेले आहेत.
मागील भाग आपल्या वाचकांना आवडल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसत आहे. आजचाही भाग तुम्हाला नक्की आवडेल.

https://soundcloud.com/sexaanibarachkahi/season-2-episode-3

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.

आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

तेव्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.

 

सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड २ – बोल की लब आजाद है तेरे – पूर्वार्ध 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. Aanjali says:

    Wonderful initiative. Keep it up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap