सेक्स आणि बरंच काही…सिझन २ : एपिसोड १- नव्याने पुन्हा एकदा….

तथापि प्रस्तुत, ‘सेक्स आणि बरंच काही…’ याच्या पहिल्या भागामध्ये आपण सेक्स, लैंगिकता, प्रेम, नाती अशा बऱ्याच गोष्टींबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत… लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलणारा हा मराठी पॉडकास्ट मधला हा पहिलावहिला प्रयोग आम्ही तुमच्याकरिता सादर केला. तुम्ही तो आनंदाने ऐकून भरभरून प्रेमही दिलंत.

पहिल्या भागात आपण सेक्स करू का नको? समलिंगी प्रेमकहाणी, लैंगिक विविधता, मानवी शरीराविषयी, लैंगिक अवयवांविषयक माहिती घेतली. लैंगिक उत्तेजना, पुरूषबीज, पुरुस्थग्रंथी, वीर्यनिर्मिती, हस्तमैथुन आणि या सगळ्यांच्या संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी समपथिक संस्थेच्या बिंदूमाधव खिरे यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मुलींचं शरीर कसं असतं, त्याची रचना कशी असते, मासिक पाळी नक्की का येते, तिच्यासंबंधी गैरसमज, गर्भधारणा, गरोदरपण याबद्दल डॉ. उज्ज्वल नेने यांच्यासोबत दिलखुलास अशी चर्चाही केली.

लैंगिक अडचणी, आजार आणि लैंगिक विकृती त्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय? बलात्कार म्हणजे काय? लैंगिक अत्याचार कोण करत? अत्याचार फक्त मुलींवरच होतात का?लहान मुलांवर अत्याचार का केले जातात? पिडोफेलिया म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्या

या शोमध्ये मधल्या काळात आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला होता. खूप लोकांनी पुढे भाग का करत नाही आहात? अशा विचारणा केल्या. म्हणून खास लोकोग्रहास्तव, नवीन उत्साहाने, नवीन विषयांसोबत, आपल्या लाडक्या गौरी अन निहार सोबत आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत सेक्स अणि बरंच काहीसिझन २

आजच्या पहिल्या भागात पहिल्या सिझन मधील काही आठवणींना उजाळा देत आहोत. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ मध्ये समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचं स्पष्ट केलं आहे, त्यावर सर्वसामान्य लोकांना काय वाटतं यावर त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.

आजचा भाग नक्की ऐका अन तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला नक्की कळवा…

तेव्हा ऐकत रहा, सेक्स अणि बरंच काहीसिझन

https://soundcloud.com/sexaanibarachkahi/sabk-season2-ep1

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap