बाळंतपणानंतरचे लैंगिक संबंध

बाळंतपणानंतरच्या लैंगिक संबंधांविषयी अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या वेबसाईटवरही अनेक प्रश्नकर्त्यांनी यासंबधी प्रश्न विचारले. बाळंतपणानंतरच्या लैंगिक संबंधांविषयीचा हा लेख खास वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहोत.

सामान्यतः बाळंतपण/प्रसूती/डीलीवरी नंतर चार ते सहा आठवड्याच्या कालावधीनंतर लैंगिक संबंध पूर्ववत चालू करण्यात काहीही अडचण नसते. प्रसूतीनंतर सेक्स करताना प्रसूती कोणत्या प्रकारची होती नॉर्मल की सिझेरिअन, प्रसुतीदरम्यान किती टाके पडले, काही अडचणी किंवा धोके होते का इ. गोष्टींचा विचार करावा. प्रसुतीदरम्यान काही अडचणी आल्या असतील तर मात्र सेक्स सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. विशेषतः बाळंतपणातून नुकतीच गेलेल्या स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तयारी आणि इच्छा महत्वाची. मात्र लगेचची गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भ निरोधक वापरणं गरजेचं आहे. दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवणं स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसंच कुटुंब नियोजनाच्या दृष्टीनेही गर्भ निरोधन फायद्याचं आहे.

सिझेरियन ही मोठी आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. पोटाला आणि आतमध्ये गर्भाशयाला भागाला छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे सिझेरियननंतर किमान ६ आठवडे पोटावर आणि गर्भाशयावर ताण येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. नॉर्मल बाळंतपणामध्ये शरीरात अनेक बदल घडतात, गरोदरपणात तयार झालेली संप्रेरकं आणि त्याचं संतुलन बाळ झाल्यानंतर काही काळात पूर्ववत होतं. मात्र सिझेरियननंतर या सर्व प्रक्रिया पूर्वपदावर यायला जास्त काळ लागतो. त्यामुळे सिझेरियन झाल्यावर किमान दीड ते दोन महिने संभोग टाळावा.

पण याचा अर्थ एकमेकांना स्पर्शही करायचा नाही असा आहे का? तर तसं काही नाही. जर दोघांची इच्छा असेल आणि त्यातही खास करून जिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे त्या स्त्रीची इच्छा असेल, तर संभोग न करता इतर प्रकारे शारीरिक जवळीक साधता येऊ शकते. शरीर संबंध म्हणजे फक्त मैथुन किंवा संभोग नाही. एकमेकांच्या जवळ येण्याचे आणि प्रेमाचे अन्यही मार्ग आहेत. पोटाला, गर्भाशयाला, टाक्यांना आणि शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या जखमांना धक्का न लावता एकमेकांच्या जवळ येता येऊ शकेल. मात्र त्यासाठी एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे, आणि कोणत्याही क्षणी थांबता येणं गरजेचं आहे.

किमान ६ आठवडे संभोग टाळणं गरजेचं आहे, हे म्हणत असताना किमान हा शब्द महत्त्वाचा आहे. स्त्रीची इच्छा, मनाची तयारी आणि तब्येत लक्षात घेऊनच संभोग कधी करायचा, करायचा का नाही हे ठरवावं. या काळात पुरुषाने, जो नुकताच बाप झाला आहे, त्याने समजुतीने वागणं अतिशय महत्त्वाचं आहे. बाळंतपणानंतर सेक्स किती दिवसांनी करावा हे बाळाच्या आईची शारीरिक आणि मानसिक तयारी आहे का याचा विचार करून ठरवणे जास्त योग्य. दरम्यानच्या काळात तुम्ही तुमचे नाते भावनिकदृष्ट्या आणि इतर मार्गांनी मजबूत करू शकता. लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती न करता दोघांना सुखावह असेल अशा पद्धतीने एकमेकांच्या जवळ आल्यास नातं नक्कीच जास्त घट्ट होऊ शकेल.

Image Courtesy: https://thefertilechickonline.com/what-sex-after-child-birth-is-really-like/

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

6 Responses

  1. vilas says:

    best website

    • I सोच says:

      विलास, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. वेबसाईटवर चर्चिल्या गेलेल्या विषयांविषयी तुमची मते आणि विचार जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.

  2. गणेश says:

    धन्यवाद

  3. Gautam says:

    Thanks sir marg darshan kelyabaddal abhari ahot

  4. Santosh says:

    Sir mla sanga majya muses chi diliveri houn 4.5 month zale ahe ani dili vari normal zali ahe pn tyamade 9 take padli ahe tr mi kevha pasun samvhadh teu. Shkto

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap