मी समलिंगी नाही ना भिन्नलिंगी, मी केवळ क्युरियस आहे.

0 1,084

आपल्याला कधी आणि काय आवडतं हे आपण ठरवू शकतो का? लैंगिकतेबाबतही असं ठाम काही असतं का?
कलर पर्पल आणि इतरही उत्तम पुस्तकांची लेखिका आणि स्त्रीवादी कार्यकर्ती अॅलिस वॉकर काय म्हणते?

मला माझी मोकळी जागा पाहिजे आणि शांतता, झाडं, गवत आणि पाणी, निःशब्दता आणि क्वचित येणारा एखादा पाहुणा. मला कुणाच्या तरी कुशीत शिरायला आवडतं, त्यामुळे कुणी तरी प्रेमाचं माणूस असलं तर मजाच असते. आणि त्याला किंवा तिला जेव्हा आपापल्या घरी परतायचं असतं तेव्हा मी त्यांना मोकळेपणाने जाऊ देऊ शकते….

मला स्त्रिया आवडतात. म्हणजे काही या विश्वातली प्रत्येक स्त्री नाही तर बाई, बाईपण मला आवडतं. आणि मला वाटतं की मी जर कुणाच्या प्रेमात पडले किंवा कुणाकडे आकर्षित झाले तर माझ्यातल्या या टोकाच्या उत्सुकतेमुळे मला त्या व्यक्ती जास्त समजू शकतात. आणि हे असंच झालं. मी स्त्रियांबरोबर किती तरी भन्नाट गोष्टी केल्या, प्रेम केलं, त्यांच्याबरोबर धमाल केली, त्यांच्याबरोबर वाढले आणि ते सगळं अतिशय सुंदर होतं अगदी त्यातलं जीवघेणं दुःखसुद्धा.

मी समलिंगी नाही, मी उभयलिंगी नाही आणि मी भिन्नलिंगी नाही. मी केवळ उत्सुक आहे. तुम्ही खरेखुरे जिवंत असाल तर तुम्ही अख्खं आयुष्य एकच काही तरी कसं असू शकता?

image courtesy – http://www.myajc.com/news/news/william-ferris-scholar-of-the-south/nZZ7T/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.