…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट

या फोटोंमधून तिने एक खास संदेश दिला आहे

0 450

सोशल नेटवर्किंगवर कधी कोणती गोष्ट चर्चेत येईल सांगता येत नाही. सध्या अशाच एका फोटोची सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु आहे. हा फोटो आहे शायून मेंडेलूक हिचा. व्यवसायिक आणि इन्स्टाग्रामवर फॅशन इन्फ्लुएन्सर आणि तज्ज्ञ असणाऱ्या शायूनने नुकतेच एक फोटोशूट केले. यामध्ये ती एका भरजरी लेहंग्यामध्ये आपल्या लहान मुलाला स्तनपान करताना दिसत आहे.

महागड्या लेहंग्यामध्ये बाळाला स्तनपान करतानाचे फोटो शूट करण्यामागे खास कारण असल्याचे तिने हे फोटो पोस्ट करताना स्पष्ट केले आहे. मूळची दक्षिण आशियामधली असलेल्या शायूनने हे फोटोशूट आशियामधील लोकांना संदेश देण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. जागतिक स्तनपान आठवड्यानिमित्त तिने हे फोटो पोस्ट करत आशियामधील लोकांना त्यांच्या स्तनपानाविषयी असणाऱ्या न्यूनगंडामधून मुक्त होण्यास सांगितले आहे.

शायूनचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर या फोटोंमागील अर्थ समजून घेणाऱ्या फॉलोअर्सचे आभार मानले आहेत.

“माझ्या शेवटच्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहून मला खूपच आनंद झाला आहे. ज्यांना ज्यांना या फोटोंमागील अर्थ कळला आणि त्यांनी तो शेअर करत इतरांपर्यंत पोहोचवला त्या सर्वांना धन्यवाद. माझ्या शब्दांनी तुम्हाला प्रेरणा मिळो हिच माझी इच्छा आहे. मला त्या फोटोंमधून कोणावरही टीका करायची नव्हती. मला फक्त एवढचं सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने आयुष्य जगा, कसलीही लाज आणि खदखद मनात न ठेवता जगा,”

असं तिने या आभार प्रदर्शनाच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

!!FOR ALL MY DESIS!!- This ones especially for you. and to all my people living in fear… In honor of #worldbreastfeedingweek I was asked and humbly accepted to share my life story with @browngirlmag titled SHAYOON MENDELUK: STORY OF A BROWN GIRL WHO DID EVERYTHING A BROWN GIRL IS TOLD SHE SHOULDNT (f*****g love this) Being of South Asian descent- I speak about letting go of your fear and living your life for YOU, Not your parents, not anyone else. Some parts of the interview: “Living in fear causes and manifests into illness and disease. Fear is a disease. You don’t have to be pressured into a career, a relationship or any of that bs because your parents want that for you. It’s emotional blackmail. Do you, do what makes you happy or you will live the life you’re trying to escape forever. If you’re gay, come out. If you’re unhappy change your life. We make shi* so complicated sometimes. But guess what? You hold the power to EVERYTHING. Your mind and body is the strongest thing you have, and when trained and used properly, can generate anything you want.” “Don’t worry about the past, or the future because they don’t f****** exist. Find your purpose. The purpose of life is to live your purpose!! Heal, grow, and then help others do the same!” Please click the link in my bio to read more! My beautiful lengha is by @papadontpreachbyshubhika my stunning jewelry is @samreenvance Shot by @mendeluk makeup @elevateibiza #ibiza #shayoon #shayoonmendeluk #browngirlmag #browngirl #desi #pakistani #indian #india #pakistan #heal #normalizebreastfeeding #breastfeeding #breastfeedinginpublic #breastfeedingmom #breakingnews #ibiza #spain #healing #breastfeedingawareness #browngirls #love #awaken #thelightforcecenter

A post shared by Shayoon Mendeluk (@shayoon_) on

 

बातमीचा स्त्रोत :

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.