Browsing Tag

नक्की वाचा

संशयाचं भूत

आपल्या पत्नीचं शीर कुऱ्हाडीने धडावेगळं करून ते हातात घेऊन पुण्याच्या रस्त्यावर फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा फोटो हादरवून सोडणारा होता. जिच्यासोबत निम्म्याहून जास्त आयुष्य घालवलं, संसार केला तिच्याच चारित्र्यावर पराकोटीचा संशय पतीच्या मनात…

काही वावगं नाही… सगळं नॉर्मल आहे…

आपण सगळे मानव आहोत. आपण सगळे एक आहोत तरी आपल्यातला प्रत्येक जण वेगळा आहे. माझा रंग काळा आहे पण माझी मैत्रीण गोरी आहे. मी जाड आहे तर माझा भाऊ लुकडा. काही जणांच्या शरीरात लिंग आणि वृषणं असतात तर काहींच्या शरीरात गर्भाशय आणि योनिमार्ग. काहींना…

गर्भधारणा नक्की कशी होते?

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत. बहुतेक स्त्रियांच्या शरीरात…

मर्द आणि मर्दानगी

हे शब्द आपल्या खूप परिचयाचे आहेत. लहानपणापासून खूपदा ऐकलेले असतात. मुख्यतः मर्द हा शब्द पुरुषांना उद्देशून वापरतात. पण मग पुरुष आणि मर्द हे समान अर्थी शब्द समजले जातात का? तर नाही. त्यात थोडा फरक आहे. जन्मतः ज्यांना लिंग असते ते सर्व पुरुष…

या देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून?

कोल्हापूरच्या १७ वर्षांच्या ऐश्वर्या लाडचा खून तिच्या भावानेच केला. ती फॅशनेबल राहायची म्हणून? ती व्हॉट्सॅप, फेसबुकवर मुलांशी चॅट करायची म्हणून? ती कॉलेजच्या कॅऩ्टीनमध्ये मुलांशी बोलायची म्हणून? ती त्याच्यापेक्षा जास्त हुशार होती म्हणून? ती…

नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी

एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, शारीरिक ओढ म्हणून किंवा कधी कधी जबरदस्तीनेही लैंगिक संबंध केले जातात. लैंगिक संबंधांमध्ये गर्भधारणेची शक्यता असते. ही गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात. यांना…

सुरक्षित, सुखकर लैंगिक संबंध

लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे असे संबंध ज्यात जबरदस्ती नाही ज्यामध्ये नको असलेल्या गर्भधारणेची भीती नाही ज्यामध्ये एकमेकांना लिंगसांसर्गिक आजाराची लागण होण्याचा धोका नाही…

लैंगिकतेची काही मूलभूत तत्वं

निवडीचा अधिकार, प्रतिष्ठा, वैविध्य, समानता आणि आदर हे पाच मानवी अधिकार आहेत. आणि हेच अधिकार लैंगिकतेची मूलभूत तत्वंदेखील आहेत. निवडीचा अधिकार स्वतःच्या लैंगिकतेबद्दळ निवड करण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा. ही निवड मुक्तपणे, कोणत्याही…

लैंगिकतेबद्दल का बोलायचं?

स्वतःच्या शरीराबद्दल, भाव भावनांबद्दल, प्रेम आणि आकर्षणाबद्दल, आजारांबद्दल आपण किती मोकळेपणी बोलतो? आपल्या इच्छा, आवडी, नावडी आपण स्पष्टपणे मांडू शकतो का? आपल्याला कोणत्या गोष्टी घाण किंवा घाणेरड्या वाटतात? आपल्याला कोणत्या गोष्टींची भीती…

लैंगिकता म्हणजे नक्की काय काय?

सगळ्यांना असं वाटतं की लैंगिकता म्हणजे लैंगिक संबंध, सेक्स किंवा त्याविषयीचे व्यवहार, वागणं, इत्यादी. पण लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स नाही. आपण आपल्या मनात असणाऱ्या लैंगिक भावना कशा व्यक्त करतो, आपल्या लैंगिक आवडी आणि निवडी, आपले लैंगिक संबंध…