तुमचा आमचा ग़ालिब

(१७९७-१८६९)

0 569

हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे

कहतें हैं ग़ालिब का अंदाज़े बयां और|

आज (२७ डिसेंबर) ग़ालिब उर्फ मिर्ज़ा असदुल्लाह बेग खान यांचा वाढदिवस. टोपण नावाने अजरामर झालेल्या काही मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणून ते नाव अगोदर. शिवाय हा इतका ‘आपला माणूस’ की त्याला कोणी ‘अहो जाहो’ करत नाही. त्याच्या नावाच्या मागे नवाब/जी/साहब अशी उपनामं लावायची गरज कोणालाच वाटत नाही. खरे तर मिर्ज़ा हे उपनाम आहे त्याच्या नावाच्या अगोदर पण ते कोणी सहसा वापरत नाही. ग़ालिबचा अर्थ प्रमुख/वरचढ, त्याचा मिजाज़ही नावाला शोभेल असाच. पण आपल्या पश्चात १५० वर्षानंतर लोक आपल्याला ‘कुटुंबातील एक’ मानतील असा विचार त्यानेही केला नसावा. आज त्याची जयंती असं मी म्हणत नाही कारण अशी माणसं मेली असं वाटतच नाही, ते सजीव असतात आपल्या मनात, आजूबाजूच्या सेंद्रिय वातावरणात.

शेरोशायरी तशी एलिट क्लास ची मक्तेदारी. पण ग़ालिब आणि त्याच्या वारसदारांनी ती आपल्या सामान्य भारतीय मनात खोलवर रुजवली. तब्बल पाचशे वर्षांच्या कडूगोड इतिहासाने इथे निर्मिलेल्या गंगा-जमुनी संस्कृतीचा, ‘हिंदू-मुस्लीम-सिख-इसाई’ या सहज सहवासाचा ठेवा म्हणजे उर्दू ज़बान आणि त्यातही विशेष म्हणजे उर्दू काव्य. आजच्या एकट्या, एकसाची, उन्मादी वातावरणाचा शिकार असलेल्या मनाला कदाचित शांती देऊ शकेल असे हे काव्य..

ग़ालिबचे काव्य म्हणजे प्रेम आणि जीवनाच्या तत्वज्ञानाचा सुंदर मिलाफ. आज त्याच्या वाढदिवशी प्रेम-मैत्रीविषयी बोलणाऱ्या आपल्यासारख्यांनी त्याची आठवण नाही काढायची तर कोण! त्याचे काही ओळखीचे, काही अनोळखी शेर आपल्या वेबसाईटच्या वाचकांसाठी खास.

आवडल्यास जरूर कमेंट करा, लिंक इतरांना पाठवा..

मेहेरबां होके बुला लो मुझे चाहो जिस वक्त

मैं गया वक्त नही हूँ की फ़िर आ भी न सकूं

——

मोहोब्बत में नही है फ़र्क जीने और मरने का

उसिको देख कर जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले

—–

ये न थी हमारी क़िस्मत के विसाले-ए-यार होता

अगर और जिते रहते यही इंतजार होता

—–

मैं बुलाता तो हूँ उसको मगर ऐ जज़्बा-ए-दिल

उसपे बन जाए कुछ ऐसी के बिन आए न बने|

 इस नजाकत का बुरा हो, व़ोह भले हैं तो क्या

हाथ आये तो उन्हें हाथ लगाये न बने

—–

दिल ही तो है न संग-ओ-खिश्त, दर्द से भर न आए क्यों

रोएँगे हम हज़ार बार, कोई हमें सताए क्यों

—–

जला है जिस्म जहाँ, दिल भी जल गया होगा

कुरेदते हो जो अब राख, जुस्तजू क्या है|

—–

आणि शेवटी त्याचे स्वतःचे वर्णन त्याच्याच शब्दात…

बस के हूँ ग़ालिब असीरी में भी आतिश जार-ए-पा

मू-ए-आतिश दीदा है हल्का मेरी ज़ंजीर का

(चित्र – गूगलवरून साभार)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.