लैंगिक अत्याचार पीडितांना ‘We Together’ समिती कायदेशीर मदत पुरवणार

पुण्यातील कायदा व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी ‘We Together’ नावाची समिती स्थापन केली असून, या माध्यमातून लैंगिक अत्याचार पीडित स्त्रियांना कायदेशीर मदत पुरवली जाणार आहे. शिवाय, समुपदेशनाचं कामही या समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे.

0 222

पुणे : लैंगिक अत्याचाराविरोधात देशभरात ‘मी-टू’ नामक चळवळ सुरु झालीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्षभरापासून सुरु असलेली ही चळवळ अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर भारतातही जोर धरु लागली. एकामागोमाग एक अनेकांवर आरोप होऊ लागले. ‘मी-टू चळवळ प्रामुख्याने सोशल मीडियावरुन अधिक प्रसारित झाली. मात्र सर्वसामान्य स्त्रियांचं काय, ज्यांना आपली ओळख समोर आणायची नाही, मात्र आपल्यावरील अत्याचाराविरोधातही लढायचंय, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मात्र अशा स्त्रियांच्या मदतीसाठी पुण्यातील कायदा व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी ‘WeTogether (#WeToo) नावाची समिती स्थापन केली असून, या माध्यमातून लैंगिक अत्याचार पीडित स्त्रियांना कायदेशीर मदत पुरवली जाणार आहे शिवाय, समुपदेशनासारखं अत्यंत महत्त्वाचे कामही या समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे.

‘We Together’ समितीचे आवाहन

‘मी-टू’ चळवळीने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. ही चळवळ फक्त अभिनेत्री व इतर प्रसिद्ध व्यक्तींपूरती  मर्यादित न ठेवता सामान्य कुटुंबातील महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भूमिका समितीच्या सदस्यांनी मांडली असून “सामान्य कुटुंबातील व ग्रामीण भागातील महिलांवर सामाजिक दडपण असते त्यामुळे त्या सोशल माध्यमामांवर व्यक्त होतीलच असे नसते. ज्या मुलींवर काही अत्याचार हात आहे व ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी या समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा,  असे आवाहन करण्यात आले आहे.

‘We Together’ समितीचे आवाहन

आम्ही इतर लोकांना देखील आवाहन करू इच्छितो की, तुम्हाला आमच्यासोबत जोडून घ्यायचे असल्यास 7038443776 या नंबरवर आम्हाला #WeToo असा हशटॅग वापरून आपलं नाव व जिल्हा व्हॅटसअप करा.  WhatsApp ग्रुप ला सहभागी होण्यासाठी खालिल लिंक वर क्लिक करुन Join व्हावे
https://chat.whatsapp.com/EOKf9KnLWUtGfPDej0UjYu

कोणाला आम्हाला फेसबुकवर मेसेज करायचा असल्यास या पेजवर जावे

https://www.facebook.com/We-Too-335170660589913/

महत्त्वाचे म्हणजे मदत करत असताना पीडितेची कोणतीही ओळख जाहीर केली जाणार नाही. जेणेकरुन पीडितेला कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. लैंगिक अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास ‘We Together’ समितीच्या सदस्यांशी थेट संपर्क करता येईल.

त्यासाठी संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे :

कल्याणी माणगांवे – 7507612037
मृदगंधा दीक्षित – 9404700738
शर्मिला येवले- 7038443776
स्वाती कांबळे -7387723184
सारिका आखाडे -9921720354
दीपक चटप-9130163163
भूषण राऊत- 9823183820
आदर्श पाटील- 8806336033
नितीन जाधव-7218415177

बातमीचा स्त्रोत : https://abpmajha.abplive.in/pune/we-together-committee-formed-for-helps-to-victims-of-sexual-harassment-596754? tm_source=whatsapp&utm_medium=whatsapp_share&utm_campaign=socialshare_button

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.