कबीर सिंग बाबत तुम्ही काय विचार करत आहात?

5 359

प्रिय मित्र मैत्रिणींनो,

कबीर सिंग हा चित्रपट, चित्रपटाच्या दिग्दर्शकाची मतं आणि त्यावर सोशल मिडीयावर चाललेली चर्चा तुम्ही पाहत, ऐकत असालच. हा चित्रपट प्रेमाबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे सांगू पाहत आहे ते अनेक  विचारी, संवेदनशील माणसांच्या पचनी पडताना दिसत नाही.

काही विचारी आणि संवेदनशील माणसं मात्र या चित्रपटाच्या बाजूने उभे राहून टीमला डिफेंड करत आहेत. चित्रपट आणि त्याची भाषा विखारी, पुरुषी आणि स्त्रियांचा द्वेष करणारी, त्यांना हीन लेखणारी आहे असा आरोप अनेक जण करत आहेत. दिग्दर्शक या सर्वांना ढोंगी, स्त्रीवादी आणि चित्रपट उद्योगाला लागलेला शाप म्हणत आहे.

तुम्ही काय विचार करत आहात? तुम्ही ढोंगी, स्त्रीवादी आहात की पुरुषी आणि असंवेदनशील आहात? की तुम्ही कुणीच नाही आहात? तुम्ही काहीच विचार करत नाहीत की विचारी आहात पण ते इथे तिथे मांडण्याची आवश्यकता तुम्हाला वाटत नाही. आम्हाला सांगाल? इथे मांडाल? आम्ही तुमच्या नावानिशी किंवा नावाविना ते इथे देऊ. तसे नको असेल तर स्वतःला तरी ते सांगा. बोला.

(चित्रपट पाहण्याचा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल)

5 Comments
  1. Pratik Arun Kamble says

    About the film – An honest Review – As we all know, during the very beginning of any movie, it is clearly mentioned that it is just a fictional work and in addition, there are no intentions to hurt anyone’s feelings. Now, it being an Adult movie, user discretion is advised, however, what use is viewer discretion if the adult viewers are themselves unable to understand that it is just a work of fiction and not the actual desire of the cast or its director, producer etc to be wanting to behave thay way in real life! Reel life and real life has a difference for a reason!
    Anyways – about the movie in partucular – we see the lad as an angry, drug addict, alcoholic and a person with zero anger management. And we only highlighted the part wjere he misbehaves with the girl he falls for ! But did we not observe thay he has the same behavior for men in his life or the ones who he gets in crosshairs with? All say its misogynistic, but I dont understand what dictionary they referred for misogyny ? Because if I understand misogyny properly, it means dislike of women in particular, but in the movie, we see that he dislikes a lot of things, people and society as a whole too for the irrational behavior in terms of casteism, transparency and unjust behavior of people about relationship before marriage! To me that doesn’t mean misogyny but to me it means expressing discomfort and disgust for the society as a whole and not feminism!
    Also – did we not see that he accepts the girl even when he didn’t know it was his own child that she carries in her womb? Does that mean misogyny? Does that mean he is heartless ? I feel it is a pure definition of the fact that if a man loves you, he shall accept you however you are, sure he behaves incorrectly, but does he not correct himself in the end? Does he not accept he did misbehave? Does he not rectify them? Does he not love his grandmother ? Wasn’t she a woman in the movie? Does that sound misogynistic? To me it doesn’t! Lastly, it is just a movie, for entertainment purpose and not for you to become next kabir singh for that matter ! Sure, if you wish to become one, take his positives from the movie and leave behind the negatives, which is something you cannot do! But whem it comes to shooting arrows in the dark, everyone wants to get their hands on it ! But if it comes to reality check, no one wants to confront how they are in real life ! Awful !
    Sure if you post my name, I have no issues ! Because I wouldn’t care what people would think of me! Liberality is what I believe in and freedom of expression of speech is everyone’s right! No offence to anyone reading this ! Think about it !
    Peace !
    – Pratik Arun Kamble

  2. Imran Shaikh says

    कबीर सिंग बद्दल माझा दृष्टीकोण हा आहे की, त्यामध्ये प्रेमाला योग्य तो न्याय दिला आहे पण तो मार्ग चुकीचा आहे. त्यामध्ये मुलींना दुय्यम वागणूक दिली आहेच म्हणजेच तो त्याच्या मनात येईल त्यावेळी तीला मारतो, प्रेम करतो शिव्या देतो हे चुकीचंच आहे. आणि आजची मुलं तेच अनुकरण करतात त्या चित्रपटामध्ये जो शेवट दाखवला आहे ते नाही अनुकरण करत. तो त्याच्या पहिल्या प्रेमावर ठाम असतो आणि तो ते मिळवतो. शेवटी तो बदलतो. पण जे बदलणं आहे ते मुलं नाही करणार. त्यामधलं ते शिव्या, व्यसनं हेच फॉलो करणार. सैराट मध्ये सुद्धा मुलीला पळवून आणणं सोपं आहे याच अनुकरण केलं पण त्या चित्रपटामध्ये त्यानंतर होणारा त्रास हे ही दाखवलं आहे आणि त्यात सुद्धा बदल हा दाखवला आहे पण तो बदल मुलं नाही करणार. संजू मध्ये सुद्धा तसच दाखवलं आहे आणि त्यातही बदल हा दाखवला आहे.. सांगायचं इतकंच आहे की चित्रपट सगळाच बाद नाही त्यामध्ये चांगलं ही आहे प्रश्न आहे Point Of View चा.. आणि कितीही झालं तरी रिल लाईफ आणि रिअल लाईफ वेगळी आहे. आजच्या “मुला – मुलींचं” प्रेम म्हणजे फक्त आकर्षण आहे ‘खरं प्रेम’ याचं प्रमाण हे खूप कमी आहे कारण प्रेम ही संकल्पनाच मुळात कळलेली नाही.

  3. Rahul Rathod says

    कबीर सिंग बदल सांगायच म्हटलं की, अगदी सुरूवातीपासुन म्हणजे कबीर जेंव्हा प्रीतीला पहिल्यांदा बघतो आणि त्यानंतर त्याला ती आवडते आणि मग त्याच तिला फाँलो करणं(ते तर प्रत्येक चित्रपटात असतं) पण त्यानंतर तो तिच्या हाँस्टेलवर जातो तिला खाली बोलवतो आणि त्यानंतर तिला विचारत पण नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही आणि डायरेक्ट किस हे झालं..त्यानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसतं आणि तो तिला बोलतो की, “माझ्याशिवाय तु काहीच नाही”(प्रेम असावं पण प्रेमात स्वत:च अस्तित्व विसरणं हे पटतं नाही) म्हणजे ह्याच्याशिवाय तिला किंवा तिच्या अस्तित्वाला काही अर्थच नाही…म्हणजे संपूर्ण चित्रपटाचा विचार केले असता जी प्रीती आहे तिच्या ईच्छेचा कोणत्याच ठिकाणी विचार केलेला नाही…एकविसाव्या शतकात आपण एकीकडे स्त्रीवादाच्या गप्पा मारतो आणि एकीकडे अशा चित्रपटांना डोक्यावर घेवून अप्रत्यक्षरित्या दुषित विचारांना किंवा कुजलेल्या विचारांना प्रोत्साहन देतो…
    …..असं मला वाटतं…

  4. let's talk sexuality says

    आशिष नावाच्या आपल्या मित्राची कमेंट :
    Aata Kabir sing cha vishay aala tar mg ek Kam karuyat kabir singh la Priti chya jagi theva aani Priti la Kabir singhchya jagi …. aani vichar manda

  5. Salman Mujawar says

    मला माझं वैयक्तिक मत द्यायचं होतंच या चित्रपटावर म्हणून मी हे लिहितोय.
    मी सुद्धा पहिला हा सिनेमा..! मी शाहिद चा फॅन आहे म्हणुन तर नक्कीच पहिला. त्यातच युवा वर्गाने अक्षरशः डोक्यावर उचलुन घेतलेला सिनेमा म्हणून उत्सुकता पण होतीच. म्हणून गेलो पाहायला..
    पण सिनेमा सुरू झाल्याच्या काही वेळानंतर वैयक्तिकरीत्या मला काही गोष्टी खटकल्या, मी सिनेमा सुरू असताना आणि संपल्यानंतर देखील त्यावर चर्चा केली. मी काही महिन्यांपूर्वी महिलादिन निमित्त २१ व्या शतकामध्ये चित्रपटातील स्त्रियांच्या बदलत्या भूमिकेबद्दल एक लेख लिहिला होता.. पण ह्या सिनेमामधील स्त्री ची व्यक्तिरेखा पहिली आणि परत तेच चित्र मला दिसलं ‘ये रे माझ्या मागल्या…!’
    मला या चित्रपटात खटकलेल्या गोष्टी म्हणजे यामध्ये दाखवण्यात आलेली स्त्री ची भूमिका ही पुन्हा सोज्वळ, नाजुक, अबला आणि स्वतःच्या बचावासाठी पुरुषावर अवलंबून असलेली अशी दाखवण्यात आली. एखादा मुलगा तिची सहज छेड काढू शकतो, तिच्या बरोबर सर्व वर्गासमोर फ्लर्ट करू शकतो, कॉलेज च्या ग्राऊंडवर सर्व लोकांसमोर तिची मर्जी न विचारता चुंबन घेऊ शकतो आणि वर म्हणतो की ‘किसीं ने नही देखा’ आणि यासाठी ती विरोध देखील करत नाही, तो तिच्यावर हात उचलू शकतो, तिच्यावर ओरडू शकतो हे व अशाच प्रकारचे इतर दृश्य आपण यामध्ये पाहू शकतो. आणि दुसरीकडे एक हुशार सर्जन सहज आपलं करिअर धारेवर देऊन प्रेम मिळालं नाही म्हणून व्यसनांचा आधार घेतो, कोणत्याही स्त्री ला तो एक भोगवस्तु म्हणुन पाहतो, आणि शेवटी प्रेम मिळालं की सुधारतो..!
    यावरून आजचा युवक काय प्रेरणा घेऊ शकतो हे माझ्या लक्षात नाही आलं.
    कुठे तरी स्त्रीप्रधान चित्रपट येण्यास सुरुवात झाली होती पण तेवढ्यात कबीर सिंग ची लाट आली आणि पुन्हा तेच पुरुषप्रधान चित्रपट.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.