क्या यही प्यार है?

1,505

मला ती आवडते म्हणजे तिने मला ‘हो’ म्हटलंच पाहिजे. मुली नाही म्हणतात म्हणजे त्यांना होकार द्यायचा असतो आणि त्यांना पटवता येतं असा समज पसरवण्यात आला आहे. आणि त्यातूनच नकारात ‘होकार’ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा होकार मिळवण्यासाठी दबाव आणला जातो. ‘ तू हा कर या ना कर’ तू माझीच आहेत असं गृहीत धरलं जातं. अशाप्रकारे समोरच्या व्यक्तीला गृहीत धरल्याने तिच्या  इच्छांचा, मतांचा विचार आणि आदर राखला जातो का? चित्रपटांमधून देखील अशाच प्रकारचे सिन्स आपल्याला दिसतात. एकतर्फी प्रेमाच्या आणि त्याच्या अतिरेकाच्या कहाण्या चित्रपटातून सर्रास दाखवल्या जातात. हिरोच असं वागत असल्यामुळं एकतर्फी प्रेमाला गृहीत धरलं गेलं आहे.  चित्रपटातील प्रेम आणि समोरच्या व्यक्तीला गृहीत धरलं जाणं, हे या व्हिडीओ मध्ये दाखवलं आहे.

तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत क्या यही प्यार है?हा व्हिडीओ अवश्य पहा.

Image Courtesy : http://imgur.com

Comments are closed.