मुंबईत महिलेने केले १७ वर्षांच्या मुलाशी लग्न, पोलिसांनी केली अटक

महिलेने त्या मुलाशी वर्षभरापूर्वीच लग्न केल्याचा दावा असून आम्ही संमतीनेच शरीरसंबंध ठेवले होते, असे त्या महिलेचे म्हणणे आहे.

1,083

 

२०१३ मध्ये भारतातील ‘बलात्कार’ याची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे, या नविन सुधारलेल्या कायद्यानुसार यामध्ये परवानगीची वयमर्यादा (Age of Consent) १८ वर्षापर्यंत वाढवलेली आहे. ज्याचा अर्थ असा आहे कि, अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणाही व्यक्तिसोबत संमतीने शरीरसंबंध ठेवले तरी कायद्यानुसार तो बलात्कारच आहे.

आणखी माहितीसाठी पुढील लिंक पहा.

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)- २०१२

 

मुंबई पोलिसांनी २२ वर्षांच्या महिलेला १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. तर महिलेने त्या मुलाशी वर्षभरापूर्वीच लग्न केल्याचा दावा असून आम्ही संमतीनेच शरीरसंबंध ठेवले होते, असे त्या महिलेचे म्हणणे आहे. सध्या महिला भायखळा तुरुंगात असून तिने जामिनासाठी अर्ज देखील केला आहे.

कुर्ला पोलिसांकडे गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये एका महिलेने तक्रार दिली होती. तिला १७ वर्षांचा मुलगा आहे. ‘माझ्या मुलाचे २२ वर्षांच्या तरुणीने अपहरण करुन स्वत:च्या घरात डांबून ठेवले. तिने बळजबरीने त्याच्याशी लग्न केले’ असा आरोप तिने केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी २२ वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. महिलेला ४ महिन्यांची मुलगी देखील आहे. ‘मी त्या मुलाशी लग्न केले असून तो १८ वर्षांचा आहे. आम्ही संमतीनेच शरीरसंबंध ठेवले होते. आम्हाला चार महिन्यांची मुलगी देखील आहे’, असे आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी महिलेला पॉक्सो अॅक्ट, बालविवाह प्रतिबंधक कायदा व अन्य कलमांखाली अटक केली आहे.
आरोपी महिला तिच्या चार महिन्यांच्या मुलीसह गेल्या पाच दिवसांपासून भायखळा तुरुंगात आहे. तिने आता जामिनासाठी अर्जदेखील केला आहे. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पूर्ण बातमी वाचण्यासाठी बातमीचा दुवा =>  लोकसत्ता

PC : https://pixabay.com/en/users/Counselling-440107/

 

Comments are closed.