व्हॉट्सअॅपवर ओळख झालेल्या मित्राकडूनच बलात्कार, पॉर्न साईटवर व्हिडिओ टाकण्याची धमकी

963

 

व्हॉट्सअॅपवरील एखाद्या ग्रुपमध्ये अनोळखी व्यक्तीने तुम्हाला खासगीत बोलण्याचा प्रयत्न केला तर एकदा नक्की विचार करा. पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ओळख झालेल्या एका व्यक्तीने विवाहित महिलेला अश्लील विडिओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. महिला सध्या सात महिन्याची गरोदर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ शेट्टी (४४) आणि पीडित महिला दोघेही श्वान प्रेमी असून त्यांचा व्हॉट्सऍप ग्रुप आहे. याच व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. यानंतर दोघेही पर्सनल चॅटवर बोलू लागले होते. विशेष म्हणजे ते कधीही एकमेकांना भेटले नव्हते किंवा पाहिले नव्हते. दोघांमधील संभाषणा दिवसेंदिवस वाढत होते.

आरोपीने महिलेला आपण भेटून बोलू असं सांगत एका हॉटलेवर बोलावले. तिथे त्याने जबरदस्ती करत महिलेवर बलात्कार केला. इतकंच नाही तर व्हिडीओ शूट करत पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी महिलेला दिली.

यानंतरही आरोपी पीडित महिलेला धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करत होता. गेल्या एक ते दीड वर्षापासून हा प्रकार सुरू होता. पीडित महिला विवाहित असून तिला १५ आणि ८ वर्षांची मुले आहेत. विवाहित असल्याने महिला आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलण्यास घाबरत होती.

आरोपी हा छोटा मोठा व्यवसायिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिला आरोपीपासून सात महिन्याची गरोदरही होती. आरोपी शिवीगाळ आणि मारहाण करून बलात्कार करत असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे. गरोदर झाल्यानंतर आरोपीने महिलेला लग्नाचे अमिष दाखवले. दरम्यान पीडित महिलेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती. त्यामुळे अखेर पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बातमीचा स्त्रोत : https://www.loksatta.com/pune-news/a-woman-raped-by-whatsapp-friend-1804359/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS

 

मोबाईलचा गैरवापर थांबवा

स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

संमती म्हणजे काय?

 

Comments are closed.