सोशल मीडियातील मैत्रीतून पुण्याच्या तरुणीवर अत्याचार

0 655

 

जळगाव – पुण्यात अकरावीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची फेसबुकवर मैत्री करून मोबाईल क्रमांक मिळवत व्हॉटस्‌ॲप चॅटिंगनंतर लग्नाचे आमिष दाखवत जळगावच्या संशयित तरुणाने पुण्यात जाऊन अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या अश्‍लील क्‍लिपिंग काढून तिला ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या संशयिताविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पुणे पोलिसांनी येथील बळिरामपेठेतील तरुणास अटक केली आहे.

बळिरामपेठेतील रहिवासी गौरव रूपा चंदनकर (वय २०) याने फेसबुकद्वारे पुण्यातील सोळावर्षीय तरुणी सुश्‍मिता (काल्पनिक नाव) हिच्याशी फेसबुकवर मैत्री केली. फेसबुक मॅसेंजरवर चॅटिंग करून मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर व्हॉटस्‌ॲपवर चॅटिंग करून लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात जाऊन गौरवने १६ नोव्हेंबर २०१८ ला तेथील शिवनेरी लॉजवर नेऊन अत्याचार केले. तसेच पीडितेचे मोबाईलमध्ये शूटिंग करून घेत लग्नाचे वचन देत पुन्हा २२ नोव्हेंबरला गौरवने त्याच लॉजवर बोलावून अत्याचार करीत निघून गेला.

अन्‌ गुन्हा दाखल
पीडितेच्या आईला घडला प्रकार कळल्यानंतर दोन दिवसांनी २४ नोव्हेंबरला बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावर पुणे येथील पोलिस जळगावात धडकले. उपनिरीक्षक एम. पी. निंबाळकर यांच्यासह पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बळिरामपेठेतून गौरव चंदनकर याला ताब्यात घेतले. पोलिस पथक त्याला घेऊन पुण्याला रवाना झाले.

प्रेमाचा ‘ब्ल्यू व्हेल गेम’
गौरवने पीडितेची मोबाईलमध्ये अश्‍लील शूटिंग केली होती. याच शूटिंगची भीती दाखवून त्याने व्हॉटस्‌ॲपद्वारे पीडितेस स्वत:च्या अंगावर ब्लेडने कापून घेत ‘आय लव्ह यू’ लिहिण्याचे सूचित केले. गौरव सांगत असलेल्या बाबींना विरोध केल्यानंतर त्याने मग ‘तुझे प्रेमच नाही असे म्हणत… मी सोडून दिले’ असे धमकावून अल्पवयीन मुलीकडून अंगावर इजा करवून घेत तसा व्हिडिओ व्हॉट्‌सॲपवर टाकायला लावला. जगात बंदी असलेल्या ‘ब्लू-व्हेल गेम’प्रमाणे गौरवने हा प्रकार करून घेतला.

बातमीचा स्त्रोत : https://www.esakal.com/uttar-maharashtra/rape-blackmailing-crime-social-media-156997

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.