या देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून?

8,478

कोल्हापूरच्या १७ वर्षांच्या ऐश्वर्या लाडचा खून तिच्या भावानेच केला.

ती फॅशनेबल राहायची म्हणून?

ती व्हॉट्सॅप, फेसबुकवर मुलांशी चॅट करायची म्हणून?

ती कॉलेजच्या कॅऩ्टीनमध्ये मुलांशी बोलायची म्हणून?

ती त्याच्यापेक्षा जास्त हुशार होती म्हणून?

ती त्याची बहीण होती म्हणून?

तो तिचा भाऊ होता म्हणून?

तिचं वागणं सुधारण्याचा त्याला हक्क होता म्हणून?

पुरुषसत्तेने त्याला बहिणीवर नियंत्रण ठेवण्याची मुभा दिली म्हणून?

मुलं, पुरुष रागावर ताबा ठेऊ शकत नाहीत म्हणून?

मत मांडण्याची वेगळी पद्धतच माहित नाही म्हणून?

का या देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून?

 

भारतीय संविधानाच्या कलम २१ ने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा, सन्मानाचा आणि अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे.
याची आठवण ठेऊ या.  भाऊ, बाप, काका, मित्र, नवरा आहोतच. आदर ठेवणारा माणूस बनून पाहू या का?

तुमचे विचार नक्की कळवा.

image: pinterest

Comments are closed.