सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का?
सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का हे कसं ओळखाल? काही प्रश्न दिले आहेत. त्याची उत्तरं होय असतील तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात,
- तुम्हाला मनापासून सेक्स करावंसं वाटत आहे का?
- तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा. तुम्हाला आतून जे वाटत असतं त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- तुमची संमती आहे का?
- जरी तुम्ही प्रेमात असाल आणि तुमच्या जोडीदारावर तुमचं खूप मनापासून प्रेम असेल तरी शारीरिक संबंधांना तुमची मान्यता आहे का याचा विचार करा. अशा संबंधांमध्ये गैर काही नाही, पण तुमची संमती मात्र हवी.
- तुमचा तुमच्या जोडीदारावर विश्वास आहे का?
- ज्याच्यावर किंवा जिच्यावर तुमचा विश्वास आहे अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवणं हा सुखद अनुभव ठरू शकतो. तुम्ही पहिल्यांदाच सेक्स करणार असाल तर हा विश्वास आणि मोकळेपणा फार महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला कशाने सुख किंवा आनंद मिळतो हे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलू शकता का?
- तुम्हाला अवघडल्यासारखं वाटलं तर तुम्ही नाही म्हणू शकता का?
- हा नकार तुमचा जोडीदार पचवू किंवा स्वीकारू शकेल का याचा विचार करणं गरजेचं आहे.
‘संभोगासाठी तयार आहात का’ या प्रश्नावली मध्ये वयाचे आणि कायद्याचे भान आहे का? हा ही प्रश्न अधोरेखित असावा!
विक्टर,
तुमची कमेन्ट महत्त्वाची आहे. कायद्याचा विचार असावा मात्र कधी कधी केवळ तेवढाच पुरेसा नसतो. आपण सज्ञान असलो पण आपण संभोगासाठी तयार नसलो तर?
हेच वयाबाबतही आहे. कोणत्या वयात शारीरिक आणि लैंगिक संबंध ठेवावेत असा नियम करणं फार अवघड आहे.
आपली इच्छा, संमती, एकमेकांवरचा विश्वास आणि जबाबदारीची जाणीव वयापेक्षा जास्त महत्त्वाची आहे.
तुम्हाला काय वाटतं?
मी काही अंशी दोन्ही मतांशी सहमत आहे पण विक्टर चे मत जास्त योग्य वाटते त्याचे कारण i सोच ने जो रिप्लाय केला आहे त्यातच आहे… “कायद्याचा विचार असावा मात्र कधी कधी केवळ तेवढाच पुरेसा नसतो. ” यातील “कधी कधी” हे खूप महत्वाचे आहे आणि मला वाटते की ते आपण नाही ठरवू शकत. तसेच लैंगिक संबंध ठेवणे हे नियम करून ठरवता येणार नाही पण त्यासाबंधित अधिकार, कर्तव्य याचा विचार केला तर कायदेशीर वयाबद्दल माहिती असणे मदतीचे ठरेल. जरी निर्णय लैंगिक संबंध ठेवणाऱ्या त्या २ व्यक्तींचाच असला तरी हि माहिती देताना आपण सर्व बाजू समोर ठेवणे अपेक्षित आहे.
अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Sex विषयी अज्ञान ही भारतीय तरुणवर्गाची समस्या आहे
यातुन अनेक गैरसमज व विकृति निर्माण होतात,
इसे लेख तरुणांनी आवर्जुन वाचावेत , सर्व शंकाचे निरसन होईल
तरुणांनी उस्फुर्त प्रतिक्रिया देने, प्रश्न विचारणे, समजुन घेणे येथे अपेक्षित आहे