शरीर साक्षरता – किशोरवयीन मुलांसोबत

2,781

किशोरवय हा वादळी काळ समजला जातो. लहान मूल मोठं होण्याचा म्हणजेच वयात येण्याचा हा काळ असतो. शरीरात, मनात, भावनांमध्ये झपाट्याने बदल होत असतात. आजूबाजूच्या किंवा मित्र मैत्रिणींच्यापेक्षा कधी कधी हे बदल जास्त वेगाने किंवा हळू होत असतात. अनेक प्रश्न पडतात. मुलींना पाळी सुरू होते. मुलांच्या लैंगिक अवयवांची वाढ व्हायला लागते. कधी कधी वीर्य बाहेर यायला लागतं. अशा या स्थित्यंतराच्या काळा मुला-मुलींना शरीराची आणि शरीरात होत असलेल्या किंवा होऊ घातलेल्या बदलांची माहिती होणं आवश्यक असतं.

तथापि या संस्थेने याच उद्देशाने शरीर साक्षरता मुलांसाठी हा कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये 10 वर्षापुढील मुलं-मुली, त्यांचे पालक आणि शिक्षकांसाठी काही वर्कबुक्स तयार करण्यात आली आहेत. स्वतःच्या शरीराशी मैत्री केल्याने हे बदल आणि नव्या भावना यांचा सकारात्मक अर्थ लावायला मुलांना मदत होते. तसंच नावडत्या स्पर्शापासून किंवा लैंगिक छळापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं याची कौशल्यं मुलं शिकतात.

अधिक माहितीसाठी तथापि ट्रस्टशी संपर्क साधा.

Comments are closed.