Browsing Category

मेरी मर्जी

आपल्याला काय हवं आहे आणि काय आवडतं ते आपल्याला दर वेळी ठरवता येतं का? आपल्याला आपल्या मनाप्रमाणे निवड करता येते का? एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर आपण ते खुलेपणाने व्यक्त करू शकतो का? आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कपडे घालता येतात का आणि हवं तेव्हा हवं त्या ठिकाणी जाता येतं का? हा निवडीचा आणि स्वतःसाठी गोष्टी ठरवण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा अधिकार आहे.
आपली लैंगिक नाती, संबंध आणि लैंगिक आरोग्य याबाबत निर्णय घेण्याचा आणि हे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. कोणत्याही दबावाशिवाय, मोकळेपणाने, परिणामांची माहिती असताना आपण आपल्या नात्यांसंबंधी निर्णय घेऊ शकलो पाहिजे. या सदरामध्ये आम्ही निवडीच्या अधिकाराविषयी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीविषयी बोलणार आहोत.

पत्र: अठरावं पूर्ण झाल्यावरचं – मैत्रेयन

कनी मैत्रेयीची केरळमध्ये राहणारी एक मैत्रीण. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पंधरा वर्षांपूर्वी त्या केरळमध्ये एकमेकींना भेटल्या. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. मैत्रेयी आणि कनी ज्या कला जथ्थ्याचा भाग होत्या तो तिरुअनंतपुरममधून पुढे निघाला…

‘चि. व चि. सौ. का.’च्या निमित्ताने- सचिन, निशा

‘चि. व चि. सौ. का’ या चित्रपटाची सुरवातच खरं तर गमतीशीर आणि विचार करायला लावणारी आहे.  रजिस्टर ऑफिसमध्ये एकमेकांशी एकदम गुडी-गुडी बोलणारं जोडपं म्हणजेच सत्याचा 'मित्र' आणि सावीची 'मैत्रीण' लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवशीच एकमेकांशी कडाक्याने…

निमित्त ‘चि. व चि. सौ. का’ चं…- निहार सप्रे

कोणतीही कथा कितीही साधी असली तरी ती लिहणारा लेखक किंवा त्या कथेला चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर ठेवणारा दिग्दर्शक जाणते – अजाणतेपणे अनेक वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवत असतो. या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवताना त्या लेखकाला/दिग्दर्शकाला…

जोडीदाराची विवेकी निवड – निशा फडतरे

'लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात' असं एक गृहीतक च समाजात रूढ आहे. या बांधलेल्या गाठी मग कधी कच्च्या तर कधी पक्क्या अशा पण असतात का ? मनात सहज प्रश्न येतो, ज्या व्यक्तीला आपण पूर्णपणे ओळखत देखील नाही अशा व्यक्तीसोबत आयुष्य…

८ मार्च २०१७: आंतरराष्ट्रीय महिला दिन जिंदाबाद !

स्वातंत्र्य, समता, बंधुभाव जिंदाबाद! दहशतवाद ,धर्मांधता, जातीयवाद मुर्दाबाद! महिलांच्या एकजुटीचा विजय असो! घटनात्मक हक्कांचे संरक्षण करा! न्यूयॉर्कच्या ज्या लढाऊ शिवणकामगार महिलांनी रस्त्यावर येऊन ८ मार्च १९०८ रोजी शोषणाविरुद्ध लढा…

ग्लोबल सर्वार्थानं

ती म्हणाली, आवडतो मला जाहिरातीतील पुरुष केसांना जेल लावून आभास निर्माण करणारा सचैल स्नान केलेल्या गोपींचा; आवडतात मला त्याचे कामुक डोळे देहात आरपार शिरणारे; त्याचं फिजिक आणि सेक्स अपील तरंगत राहतं माझ्या डोळ्यांत; मी बंद करते…

माझं शरीर माझा हक्क

मध्यंतरी दीपिका पदुकोन या अभिनेत्रीचा ‘माय बॉडी माय चॉइस’ हा व्हिडीओ सोशल मीडियातून मोठय़ा प्रमाणावर पाहिला गेला. अनेक ठिकाणी या विषयावर चर्चा होऊनही मुख्यत्वे ही चर्चा बाईच्या लैंगिकतेशी निगडित राहिली. बाईचा तिच्या शरीरावरचा अधिकार हा जरी…

पार्च्ड : नग्न देहापलीकडचं नग्न सत्य_नम्रता भिंगार्डे

चित्रपट अत्यंत खुलेपणानं आपल्यासमोर उलगडत जातो. आजवर बॉलीवूडमध्ये 'ओपन' असणं म्हणजे सिनेमात अभिनेत्री कम हिरॉईन कम आयटम गर्लने कमी कपड्यांत दिसणं किंवा अंथरूणावरचे बोल्ड सीन्स देणं हेच मानलं गेलंय...पण 'पार्च्ड'मधला खुलेपणा पाहताना खाली…

प्रिय मुलींनो_ केटलिन मोरान

मित्र-मैत्रिणींनो, नुकतंच अमिताभ बच्चनने आपल्या नातींसाठी स्व-हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र सर्व माध्यमांत प्रसिद्ध झालं आणि प्रचंड चर्चिलं गेलं. या पत्राला अनेक सकारात्मक आणि काही टीका करणाऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या. या चर्चेचा आढावा घेताना…

‘डोन्ट शूट’_अच्युत बोरगावकर

परवा एका मैत्रिणीचा फोन आला. दवाखान्यातून नुकतीच घरी आली होती. “काय झालं होतं?” मी विचारलं तर म्हणाली, “काही नाही”. “काही नाही साठी दवाखान्यात जायला लागलं?” मी म्हणालो. “बीपी वाढला होता, खूप ताप आला होता, एवढंच डॉक्टर म्हणाले” ती म्हणाली.…