मेरी मर्जी
आपल्याला काय हवं आहे आणि काय आवडतं ते आपल्याला दर वेळी ठरवता येतं का? आपल्याला आपल्या मनाप्रमाणे निवड करता येते का? एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर आपण ते खुलेपणाने व्यक्त करू शकतो का? आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कपडे घालता येतात का आणि हवं तेव्हा हवं त्या ठिकाणी जाता येतं का? हा निवडीचा आणि स्वतःसाठी गोष्टी ठरवण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा अधिकार आहे.
आपली लैंगिक नाती, संबंध आणि लैंगिक आरोग्य याबाबत निर्णय घेण्याचा आणि हे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. कोणत्याही दबावाशिवाय, मोकळेपणाने, परिणामांची माहिती असताना आपण आपल्या नात्यांसंबंधी निर्णय घेऊ शकलो पाहिजे. या सदरामध्ये आम्ही निवडीच्या अधिकाराविषयी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीविषयी बोलणार आहोत.